शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

दिल्लीत राष्ट्रपती राजवटीसारखी परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 03:49 IST

आयएएस अधिकाऱ्यांच्या असहकारांच्या धोरणामुळे दिल्लीत राष्ट्रपती राजवटीसारखी परिस्थिती आहे, असा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

नवी दिल्ली : आयएएस अधिकाऱ्यांच्या असहकारांच्या धोरणामुळे दिल्लीत राष्ट्रपती राजवटीसारखी परिस्थिती आहे, असा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तीन मंत्र्यांसह केजरीवाल यांनी नायब राज्यपालांच्या कार्यालयात धरणे आंदोलन सुरू केले असून शनिवारी या आंदोलनाचा सहावा दिवस होता. आयएएस अधिकाºयांंना संप समाप्त करण्यास सांगा अशी मागणी आपचे नेते नायब राज्यपालांकडे करत आहेत.दिल्ली सरकारमधील आयएएस अधिकारी मंत्रिमंडळाच्या बैठकांना हजर राहत नाहीत आणि मंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकांनाही जात नाही. आम्ही संप केलेला नाही, असा त्यांचा दावा आहे. आम्ही रोज कार्यालयात येतो. सरकारचा निषेध म्हणून पाच मिनिटे काम करीत नाही. नंतर मात्र नियमित काम करतो, असा त्यांचा दावा आहे.दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन आणि कामगार मंत्री गोपाल राय यांनी सोमवारपासून राज्यपालांच्या कार्यालयात धरणे धरले आहेत. जैन आणि सिसोदिया क्रमश: मंगळवार आणि बुधवारपासून या उपोषणात सहभागी झाले आहेत. केजरीवाल यांनी ट्विट केले आहे की, पंतप्रधान मोदी तरी आपल्या अधिकाºयांशिवाय काम करू शकतात काय?आयएएस अधिकाºयांच्या संपावरुन त्यांनी मोदींवर निशाणा साधला आणि अधिकाºयांशिवाय काम करुन दाखविण्याचे आव्हान दिले. मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केजरीवाल यांनी त्यांना आवाहन केले आहे की, आएएस अधिकाºयांचा संप समाप्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा. सिसोदिया यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून म्हटले आहे की, आपल्याला जर नायबराज्यपालांच्या कार्यालयातून जबरदस्तीने बाहेर काढले, तर आपण पाण्याचाही त्याग करु. घरूनच काम पाहणाºया नायब राज्यपालांनी मंत्र्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे.>प्रदूषणविषयक बैठकीलाही सचिव गैरहजरपर्यावरणमंत्र्यांनी दिल्लीतील धुळीचे वादळ आणि त्यामुळे होत असलेले धोकादायक प्रदुषण या विषयावर बैठक बोलावली होती. त्या बैठकीलाही संबंधित खात्याचे सचिव गैरहजर राहिले. दिल्लीकर अशा संकटाचा सामना करीत असताना, सचिवांंची ही कृती योग्य आहे का, असा सवाल दिल्लीकरच विचारत आहेत.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल