शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

70 वर्षांपासून 'अँटी हिंदू' कँपेन, I.N.D.I.A. आघाडी सनातनविरोधी; निर्मला सीतारमन यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 16:01 IST

Sitharaman on INDIA: 'द्रमुकचे धोरण सनातनविरोधी, काँग्रेसचा अशा पक्षांना पाठिंबा.'

Nirmala Sitharaman on Sanatan Row: सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्याने नवीन राजकीय वाद सुरू झाला आहे. याप्रकरणी भाजपचे अनेक नेते विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. यातच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही द्रमुकसह विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला हिंदू आणि सनातनविरोधी म्हटले. 

शुक्रवारी (15 सप्टेंबर) एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सीतारामन म्हणाल्या, 'द्रमुक नेते आणि मंत्री (तामिळनाडू) उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म नष्ट करणारे वक्तव्य केले. सर्वात जुना पक्ष काँग्रेस अशा गटांना पाठिंबा देतोय, ज्यांना भारत तोडायचा आहे. द्रमुकचे धोरण सनातनविरोधी राहिले आहे, मी स्वत: याची साक्षीदार आहे.'

'तामिळनाडूच्या जनतेने नेहमीच याचा त्रास सहन केला आहे. भाषेच्या अडथळ्यामुळे उर्वरित देशाला हे समजले नाही. द्रमुक गेल्या 70 वर्षांपासून हेच करत आले आहे. आता सोशल मीडियाचे युग आहे, त्यामुळे लोकांना डीएम नेत्याने काय म्हटले. ते सहज समजू लागले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांचे वक्तव्य म्हणजे संविधानाची थट्टा आहे, त्यांचे वक्तव्य म्हणजे मंत्रिपदाच्या शपथेचेही उल्लंघन आहे,' अशी टीका सीतारमन यांनी यावेळी केली. 

G20 च्या यशाबद्दल समाधान भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 शिखर परिषदेच्या यशाबद्दल केंद्रीय अर्थमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या, 'फायनान्स ट्रॅकने यात मोठी भूमिका बजावली. भारताने सर्व महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर एकमत मिळवले. क्रिप्टो मालमत्तेच्या नियमनाबाबत वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळी धोरणे स्वीकारली तर ते ठीक राहणार नाही. सामूहिक कृती होणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी सखोल चर्चा आवश्यक आहे.'

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमHinduहिंदूBJPभाजपाcongressकाँग्रेस