शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

...तर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 3:28 PM

जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. त्यामुळे भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला आहे. 

 नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. त्यामुळे भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला आहे. रमजान महिन्याच्या काळात पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत सीतारामन म्हणाल्या, "भारत शस्त्रसंधीच्या कराराचा आदर करतो. पण आगळीक करून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल. गृहमंत्रालयाने लष्कराशी चर्चा करून रमजानच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रत्युत्तरदाखल कारवाई करण्याचा अधिकार लष्कराला आहे. त्यामुळे लष्कराला डिवचल्यास ते नक्कीच प्रत्युत्तर देतील." 

यावेळी पाकिस्तानसोबत द्विपक्षीय चर्चेबाबत विचारणा केली असता सीतारामन यांनी सध्याच्या परिस्थितीत चर्चा होण्याची शक्यता फेटाळून लावली. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले आहे आणि आमच्या सरकारची हीच भूमिका आहे." असे त्या म्हणाल्या. 

 रमजान काळात शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय यशस्वी झाला का, अशी विचारणा केली असता सीतारामन म्हणाल्या, शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय यशस्वी झाला किंवा नाही हे निश्चित करणे संरक्षण मंत्रालयाचे काम नाही. आच्या सीमांचे रक्षण करणे हे आमचे काम आहे आणि आम्हाला कुणी डिवचले तर आम्ही शांत राहणारा नाही. डिवचण्यासाठी केल्या गेलेल्या कुठल्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाईठ आम्हाला सज्ज राहिले पाहिजे. 

तसेच लष्कराकडे शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याची कमतरता नाही. तसेच राफेल करारामध्ये  भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही बिनबुडाचा आहे, असेही सीतारामन म्हणाल्या.   

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनDefenceसंरक्षण विभागGovernmentसरकारIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान