सिताराम येचुरी म्हणतात 'पाकिस्तानशी चर्चा करुन प्रश्न सोडवा'

By Admin | Updated: October 1, 2016 16:39 IST2016-10-01T16:39:27+5:302016-10-01T16:39:27+5:30

कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी पाकिस्तानशी चर्चा करुन प्रश्न सोडवावा असं आवाहन केलं आहे

Sitaram Yechury says, 'Discuss the issues by talking to Pakistan' | सिताराम येचुरी म्हणतात 'पाकिस्तानशी चर्चा करुन प्रश्न सोडवा'

सिताराम येचुरी म्हणतात 'पाकिस्तानशी चर्चा करुन प्रश्न सोडवा'

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 1 - भारत पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दरम्यान कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी पाकिस्तानशी चर्चा करुन प्रश्न सोडवावा असं आवाहन केलं आहे. तसंच खेळ आणि कलाकारांना यामध्ये आणण्यात येऊ नये असं मतही मांडलं आहे. 
 
(फवाद खान बरळला, 'बॉलिवूड कोणाच्या बापाचं नाही')
 
'जर एखाद्या खेळाडू, कलाकार देशाविरोधात कारवाई करत असल्याची माहिती मिळत असेल तर त्याप्रमाणे कारवाई व्हावी. मात्र खेळाडू आणि कलेला यामध्ये न आणता त्यांना योग्य ती वागणूक देण्य़ात यावी. खेळ आणि कलेचं राजकारण केलं जाऊ नये', असं मत सिताराम येचुरी यांनी मांडलं आहे. सिताराम येचुरी यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी टीका करत चर्चा नेमकी कोणाशी करायची असा सवाल विचारला आहे. 
 
(पाकिस्तानी कलाकार म्हणजे दहशतवादी नाही - सलमान खान)
 
अभिनेता सलमान खाननेदेखील शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेतली होती. 'पाकिस्तानी कलाकार म्हणजे काही दहशतवादी नाहीत, त्यामुळे त्यांना भारतात काम करण्यास बंदी घालणं योग्य नाही' अशा शब्दांत अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले होते. 
 

Web Title: Sitaram Yechury says, 'Discuss the issues by talking to Pakistan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.