सीताराम येचुरी, डी. राजांना श्रीनगर विमानतळावर रोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 01:42 AM2019-08-10T01:42:17+5:302019-08-10T01:42:30+5:30

दिल्लीला परत पाठवले

Sitaram Yechury, d. Kings held at Srinagar airport | सीताराम येचुरी, डी. राजांना श्रीनगर विमानतळावर रोखले

सीताराम येचुरी, डी. राजांना श्रीनगर विमानतळावर रोखले

Next

श्रीनगर : काश्मीरच्या दौऱ्यावर आलेले माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी व भाकपचे सरचिटणीस डी. राजा या नेत्यांना शुक्रवारी श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आले. त्यांना पोलिसांनी काही काळ ताब्यात घेऊन नंतर दिल्लीला परत पाठविले. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनाही गुरुवारी या विमानतळावर रोखण्यात आले होते.

काश्मीरमधील माकपचे नेते मोहम्मद युसूफ तारिगामी व अन्य कम्युनिस्ट नेत्यांना भेटण्यासाठी येचुरी व डी. राजा श्रीनगरमध्ये आले होते. येचुरी यांनी सांगितले की, आम्हाला श्रीनगर विमानतळावरच पोलिसांनी रोखले. सुरक्षेच्या कारणामुळे असा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे होते.

जमावबंदी कायम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलमाच्या निर्णयाचे देशात सर्वत्र स्वागत झाले असून जम्मू-काश्मीरमधील स्थिती सुरळीत होत आहे, असा दावा गुरुवारी केला होता. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये सर्वत्र जमावबंदी लागू असून, नेहमीपेक्षा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यातूनच खरी वस्तुस्थिती कळून येते, अशी टीका डाव्या पक्षांनी केली आहे.

Web Title: Sitaram Yechury, d. Kings held at Srinagar airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.