शीखविरोधी दंगलीच्या फेरचौकशीसाठी एसआयटी स्थापन

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:19+5:302015-02-13T00:38:19+5:30

नवी दिल्ली : दिल्ली आणि अन्य राज्यांमध्ये घडलेल्या १९८४ च्या शीखविरोधी दंगलीची नव्याने चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी सायंकाळी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचा आदेश जारी केला, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. हे पथक सहा महिन्यात आपला चौकशी अहवाल सरकारला सादर करेल.

SIT set up for anti-Sikh riots | शीखविरोधी दंगलीच्या फेरचौकशीसाठी एसआयटी स्थापन

शीखविरोधी दंगलीच्या फेरचौकशीसाठी एसआयटी स्थापन

ी दिल्ली : दिल्ली आणि अन्य राज्यांमध्ये घडलेल्या १९८४ च्या शीखविरोधी दंगलीची नव्याने चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी सायंकाळी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचा आदेश जारी केला, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. हे पथक सहा महिन्यात आपला चौकशी अहवाल सरकारला सादर करेल.
या तीन सदस्यीय एसआयटीमध्ये दोन महानिरीक्षक दर्जाचे आयपीएस अधिकारी आणि एक न्यायिक अधिकाऱ्याचा समावेश राहील. तथापि सरकारने त्यांच्या नावाची घोषणा अद्याप केलेली नाही. सवार्ेच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जी. पी. माथुर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कमिटीने केलेया शिफारशीवरून या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. शीखविरोधी दंगलीची फेरचौकशी शक्य आहे काय हे तपासण्यासाठी ही कमिटी स्थापन करण्यात आली होती.
या कमिटीने गेल्या महिन्यात गृहमंत्री राजनाथसिंग़ यांना आपला अहवाल सादर केला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या या दंगलीची नव्याने चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात यावी, अशी शिफारस या कमिटीने केली होती. या दंगलीत ३३२५ लोक मारले गेले होते. त्यांपैकी एकट्या दिल्लीतच २७३३ लोकांचा बळी गेला होता. तर बाकीचे लोक उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि अन्य राज्यात मारले गेले होते. तथापि दंगलीच्या नेमक्या किती प्रकरणांची फाईल पुन्हा उघडण्याची शिफारस माथुर कमिटीने केली, हे समजू शकले नाही. याआधी न्या. नानावटी आयोगाने केवळ चार प्रकरणांचीच फाईल पुन्हा उघडण्याची शिफारस केलेली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: SIT set up for anti-Sikh riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.