शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बहीण खेळायला घेत नाही, मुलाची पोलिसांत तक्रार, पोलिसांनी बहीण, मैत्रिणींची काढली समजूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 05:37 IST

केरळमध्ये अशाच एका घरी थांबून त्रासलेल्या, कंटाळलेल्या आठ वर्षांच्या मुलासोबत खेळण्यास त्याच्या मोठ्या बहिणीने व इतर चार मुलींनी नकार दिला व त्याला धक्काबुक्कीही केली.

थिरुवनंतपुरम : कोरोनाच्या उद्रेकानंतर शाळा बंद झाल्या. खेळाची मैदाने ओस पडली. त्यामुळे मुलांना घरी तासन्तास बसून राहण्याचा उबग आला. ते पार कंटाळले. या परिस्थितीत घरी त्यांच्यासोबत खेळायला कोणी नसेल, तर त्यांना एकटे वाटणे अगदी स्वाभाविकआहे.केरळमध्ये अशाच एका घरी थांबून त्रासलेल्या, कंटाळलेल्या आठ वर्षांच्या मुलासोबत खेळण्यास त्याच्या मोठ्या बहिणीने व इतर चार मुलींनी नकार दिला व त्याला धक्काबुक्कीही केली. या मुलींना धडा शिकवण्यासाठी व त्यांना अटक व्हावी यासाठी त्याने पोलिसांकडे त्यांची तक्रार करण्याचा निर्णय घेतला. या त्याच्या अनपेक्षित विनंतीने पोलीस अधिकारी स्तंभित झाले हे सांगणे नकोच.पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला आम्ही उद्या तुझ्या घरी येऊ व तुझा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले. त्याची तक्रार ऐकून घेतल्यावर पोलिसांनी इतर मुलांना बोलावून घेऊन यालाही खेळायला घेत जा, असा सल्ला त्यांना दिला.‘त्या’ मला चोर-पोलीस खेळू देत नाहीतउमर निदार या मुलाने पोलिसांना सोमवारी सांगितले की, ‘त्या माझी थट्टा करतात. कारण मी मुलगा आहे. त्या मला त्यांच्यासोबत लुडो, शटल, चोर पोलीस खेळ खेळू देत नाहीत,’उमर निदारने वडिलांकडे बहीण व इतर मुलींची तक्रार केल्यावर ते थट्टेने म्हणाले की, जा पोलिसांकडे त्यांची तक्रार कर. मग उमर थेट पोलिसांकडेआला.उमर लॉकडाऊनमुळे त्याच्या मित्रांशीही खेळू शकत नसल्यामुळे वैतागला होताच. उमर हा तिसºया वर्गाचा विद्यार्थी.दोन पोलीस अधिकारी दुसºया एका तक्रारीसंदर्भात उमरच्या वस्तीत १० मे रोजी आले असताना त्याने इंग्रजीत लिहिलेली तक्रार त्यांच्या हाती दिली. त्यावेळी बरीच सायंकाळ झाली होती.

टॅग्स :FamilyपरिवारKeralaकेरळ