उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील मुंडेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला. एका विधवा महिलेने तिच्या दीराविरोधात अश्लील वर्तनाचा आणि सासू सासऱ्यांविरोधात धमकी दिल्याचा आरोप केला. पीडितेच्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
"२७ जुलै रोजी पीडित महिला आपल्या मुलीसोबत खोलीत असताना तिचा दीर आत शिरला आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवून तिच्यासोबत गैरवर्तन करू लागला. दिराला रोखण्याच्या प्रयत्नात पीडित महिलेच्या हातातील बांगडी तुटली आणि ती जखमी झाली. दरम्यान,पीडित महिलेचा आवाज ऐकूण तिचे सासू-सासरे घटनास्थळी दाखल झाले. परंतु, त्यांनी पीडित महिलेची मदत करण्याऐवजी तिलाच धमकावून दीर जसे सांगतो आहे, तसे करण्यास सांगितले", असे पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी मुंडेरा पोलिस ठाण्याचे एसएचओ प्रदीप कुमार सिंह यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून मेहुणा, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एसआय मुरलीधर मिश्रा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.महिलेचा नवरा २०२२ मध्ये आत्महत्या करून मरण पावला होता. त्या घटनेनंतर सासरच्यांनी तिच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. मात्र, ती त्या प्रकरणातून निर्दोष ठरली, अशीही माहिती आहे.