बहिणीवर बलात्कार करणारा अल्पवयीन आरोपी ताब्यात
By Admin | Updated: May 18, 2016 00:45 IST2016-05-18T00:45:51+5:302016-05-18T00:45:51+5:30
जळगाव: सख्या बहिणीवर बलात्कार करणार्या तांबापुरातील एका अल्पवयीन आरोपीस मंगळवारी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन वर्षापुर्वी गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी त्याला जळगाव येथील बालसुधारगृहात पाठविले होते. तेथून त्याला माटूंगा, मुंबई येथे पाठविण्यात आले होते. तेव्हापासून तो मुंबईतच होता. १५ मे रोजी तो तेथून फरार झाला. याबाबत शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार रत्नाकर झांबरे,अशरफ शेख व बशीर तडवी हे तांबापुरात असताना त्यांना तो नजरेस पडला. दरम्यान, त्याला घेण्यासाठी मुंबई पोलीस जळगावात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी दिली.

बहिणीवर बलात्कार करणारा अल्पवयीन आरोपी ताब्यात
ज गाव: सख्या बहिणीवर बलात्कार करणार्या तांबापुरातील एका अल्पवयीन आरोपीस मंगळवारी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन वर्षापुर्वी गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी त्याला जळगाव येथील बालसुधारगृहात पाठविले होते. तेथून त्याला माटूंगा, मुंबई येथे पाठविण्यात आले होते. तेव्हापासून तो मुंबईतच होता. १५ मे रोजी तो तेथून फरार झाला. याबाबत शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार रत्नाकर झांबरे,अशरफ शेख व बशीर तडवी हे तांबापुरात असताना त्यांना तो नजरेस पडला. दरम्यान, त्याला घेण्यासाठी मुंबई पोलीस जळगावात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी दिली.