गरज पडल्यास आमदारांविरुद्ध कडक कारवाई करू सिसोदिया यांनी मांडली भूमिका
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:01+5:302015-02-13T23:11:01+5:30
नवी दिल्ली : गत ४९ दिवसांच्या कार्यकाळातील आपल्या चुकांपासून धडा घेत, आम आदमी पार्टीने यापुढे ताकही फुंकून पिण्याचे धोरण अवलंबल्याचे चित्र आहे़ केजरीवाल सरकारमधील भावी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज शुक्रवारी याबाबतचे संकेत दिले़ नाहक मुद्दे उपस्थित करणारे वा शिस्तभंग करणाऱ्या आमदारांची यावेळी कुठलीही गय केली जाणार नाही़ प्रसंगी त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सिसोदिया म्हणाले़

गरज पडल्यास आमदारांविरुद्ध कडक कारवाई करू सिसोदिया यांनी मांडली भूमिका
न ी दिल्ली : गत ४९ दिवसांच्या कार्यकाळातील आपल्या चुकांपासून धडा घेत, आम आदमी पार्टीने यापुढे ताकही फुंकून पिण्याचे धोरण अवलंबल्याचे चित्र आहे़ केजरीवाल सरकारमधील भावी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज शुक्रवारी याबाबतचे संकेत दिले़ नाहक मुद्दे उपस्थित करणारे वा शिस्तभंग करणाऱ्या आमदारांची यावेळी कुठलीही गय केली जाणार नाही़ प्रसंगी त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सिसोदिया म्हणाले़आज शुक्रवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते़ गतवेळी पक्षाचे २८ आमदार असताना विनोद कुमार बिन्नी यांच्या बंडखोरीने आम आदमी पार्टीच्या नाकीनऊ आणले होते़ यानंतर काही जण पक्ष सोडून भाजपात जाणार असल्याच्या अफवाही उठल्या होत्या़ आता आपचे ६७ आमदार आहे़ या आमदारांना कसे सांभाळणार? असा प्रश्न केला असता सिसोदिया यांनी उपरोक्त उत्तर दिले़गतवर्ष आमच्यासाठी कसोटीचे वर्ष होते़ पण आम्ही या कसोटीवर खरे उतरलो आणि म्हणूनच आज आमचे ६७ आमदार आहे़ त्यांना सांभाळताना समस्या येईल, असे आम्हाला वाटत नाही़ पण काहींनी वादग्रस्त मुद्दे उपस्थित केलेच तर आम्ही त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही़ पक्षाने आमदारांची मोट बांधली आहे़ पक्ष आपल्या आमदारांसाठी काही मापदंड निश्चित करेल, त्याचे पालन होणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले़काही आमदारांनी अगदी काही महिन्यांपूर्वी पक्षप्रवेश केला आहे़ अशास्थितीत ते आम आदमी पार्टीचे नियम पाळतील, असे कसे गृहित धरता येईल? असे विचारले असता सिसोदिया म्हणाले की, भ्रष्टाचारविरोधी आंदोलनापासून प्रेरित होऊन ते पक्षात आले आहेत़ त्यामुळे पक्षात भ्रष्टाचाराला थारा नाही, हे ते जाणून आहेत़ याशिवाय पक्षाच्या कसोटीवर ते खरे उतरलेले उमेदवार आहे़ एकंदर पक्ष आपल्या तत्त्वांबाबत कुठलीही तडजोड स्वीकारणार नाही़ पक्षशिस्त पाळली जाईल आणि निश्चितपणे आम्ही त्या स्थितीत आहोत़