शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 15:47 IST

India-Pakistan Tension Teacher Viral Letter: मला मातृभूमीची सेवा करण्याची संधी द्यावी, असेही पत्रात लिहिले

India-Pakistan Tension Teacher Viral Letter: सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे. भारतानेपाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केल्यापासून पाकिस्तानात घबराट पसरली आहे. ते सतत भ्याड कृत्ये करत आहेत आणि ड्रोनने भारतावर हल्ला करत आहे. पण पाकिस्तानच्या नापाक करामती सफल होऊ दिल्या जात नाहीयेत. देशातील प्रत्येक नागरिक आपल्या सैन्यासोबत उभा आहे. लोकांना भारतीय सैन्याचा अभिमान आहे. या लढाईत लोकांना सैन्याला पाठिंबा द्यायचा आहे आणि बरेच लोक पुढे येत आहेत. याचदरम्यान, बिहारमधील एका शाळेतील शिक्षकाने शिक्षण विभागाला अर्ज लिहिला. पत्रात देशाबद्दलच्या भावना व्यक्त करताना शिक्षकाने लिहिले आहे की, मला पाकिस्तानविरूद्ध भारतीय सैन्याच्या कारवाईत सामील होण्याची आणि सेवा करण्याची परवानगी द्या. शिक्षिकाचे हे पत्र आता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

एनसीसी-एनएसएसचे प्रशिक्षण घेतले आहे...

पत्र लिहिणाऱ्या शिक्षकाचे नाव वैभव किशोर आहे. त्यांनी शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. एस. सिद्धार्थ यांना एका अर्जाद्वारे कळवले आहे की, मी कैमूरच्या अधौरा येथे शिक्षक म्हणून काम करत आहेत. शैक्षणिक प्रशिक्षणासोबतच मी काही गोष्टींसाठी स्वतंत्रपणे प्रशिक्षण देखील घेतले आहे. त्यांनी त्यांच्या अर्जात असेही नमूद केले आहे की, त्यांना NCC-Cच्या प्रमाणपत्रात BEE ग्रेड मिळाला आहे. याशिवाय, त्यांनी दोन वर्षे रोव्हर/रेंजर्स प्रशिक्षण देखील घेतले आहे आणि NSS चे प्रशिक्षणही घेतले आहे.

मला सेवा करण्याची संधी द्या.

वैभव किशोर यांनी त्यांच्या अर्जात लिहिले आहे की, महोदय मी तुम्हाला विनंती करतो की वरील बाब लक्षात घेऊन मातृभूमीच्या रक्षणासाठी लष्करी कारवाईत मदत करण्याची मला परवानगी द्यावी. जेणेकरून मला मातृभूमीची सेवा करण्याची संधी मिळेल. जेव्हा हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हा लोकांनीही या शिक्षकाच्या सेवाभावाचे कौतुक करायला सुरुवात केली आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत