सिन्नरला युवकाची आत्महत्या सिन्न
By Admin | Updated: December 23, 2016 00:09 IST2016-12-22T23:13:22+5:302016-12-23T00:09:46+5:30
र: येथील सोनारगल्ली परिसरात राहणार्या अमोल माणिक साळी उर्फ भावड्या (२२) या युवकाने बुधवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

सिन्नरला युवकाची आत्महत्या सिन्न
र: येथील सोनारगल्ली परिसरात राहणार्या अमोल माणिक साळी उर्फ भावड्या (२२) या युवकाने बुधवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.
आई-वडील विडीकामगार असणार्या मयत अमोल हा भावासह मजुरीचे काम करत होता. सकाळी आई-वडील विडी कारखान्यात गेले होते. दुपारी साडे तीनच्या सुमारास वडील घरी आल्यानंतर अमोल याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. साडीच्या सहाय्याने छताला गळफास घेतल्याचे दिसून आले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार कैलास व्यवहारे, विनायक अहिरे अधिक तपास करीत आहे. (वार्ताहर)