सिन्हा यांनी स्वीकारला सीबीआयचा पदभार
By Admin | Updated: December 4, 2014 00:49 IST2014-12-04T00:49:55+5:302014-12-04T00:49:55+5:30
केंद्रीय तपास यंत्रणेच्या (सीबीआय) संचालकपदी नियुक्त करण्यात आलेले अनिलकुमार सिन्हा यांनी बुधवारी येथे आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली.

सिन्हा यांनी स्वीकारला सीबीआयचा पदभार
नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणेच्या (सीबीआय) संचालकपदी नियुक्त करण्यात आलेले अनिलकुमार सिन्हा यांनी बुधवारी येथे आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. १९७९ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेल्या सिन्हा यांनी कोळसा घोटाळा, टू जी आदी घोटाळ््यांच्या तपासपद्धतीबाबत यंत्रणेवर होत असलेल्या टीकेच्या वातावरणात प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
सीबीआयच्या विशेष संचालकपदी २१ महिन्यांचा अनुभव असलेल्या व शारदा चिटफंड घोटाळ््याचा तपास करणाऱ्या ५८ वर्षांच्या सिन्हा यांच्यासमोर तपास यंत्रणेला तिची विश्वासार्हता पुन्हा प्राप्त करून देण्याचे आव्हान उभे आहे. अलीकडेच सीबीआयला सर्वोच्च न्यायालयासह अन्य न्यायालयांनी फटकारले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)