सिंगल प˜ा (क्राईम)

By Admin | Updated: January 6, 2015 00:45 IST2015-01-05T22:04:18+5:302015-01-06T00:45:43+5:30

तिडके कॉलनीतून दुचाकीची चोरी

Single post (crime) | सिंगल प˜ा (क्राईम)

सिंगल प˜ा (क्राईम)

तिडके कॉलनीतून दुचाकीची चोरी
नाशिक : तिडके कॉलनीतील स्नेहवर्धिनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली सीबीझेड दुचाकी (एमएच १५, सीजी-८१९४) चोरट्यांनी १९ डिसेंबरला चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

गोदावरी नदीपात्रात अर्भक सापडले
नाशिक : एक दिवसाचे अर्भक (मुलगा) रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गंगाघाटावरील रोकडोबा सांडव्याजवळील नदीपात्रात मृतावस्थेत आढळून आले़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात स्त्रीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

भद्रकाली परिसरातून दुचाकीची चोरी
नाशिक : भद्रकाली परिसरात घरासमोर लावलेली सीबीझेड कंपनीची दुचाकी (एमएच १५, एई-१४७५) २८ डिसेंबर रोजी चोरट्यांनी चोरून नेली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून, चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

न्यायाधीश कॉलनीतील चंदन वृक्षाची चोरी
नाशिक : त्र्यंबकरोडवरील न्यायाधीश कॉलनीतील तोरणा बंगल्याच्या आवारातील दोन हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड चोरट्यांनी चोरून नेले़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून, चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

कारची रिक्षाला धडक; दुचाकीस्वार जखमी
नाशिक : पाथर्डीगाव चौफुलीवर रविवारी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास भरधाव मारुती कारने (एमएच ०५ ए-१४०६) रिक्षाला (एमएच १५ झेड-४८४७) जोरदार धडक दिली़ यामध्ये दुचाकीने जात असलेल्या एकास दुखापत झाली असून, दुचाकीचेही नुकसान झाले़

ॲम्ब्युलन्स चालकावर गुन्हा दाखल
नाशिक : गंगापूररोडवरील प्रमोद महाजन गार्डनसमोरून मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत भरधाव ॲम्ब्युलन्स (एमएच १५ सीके-३४७७) चालविणार्‍या चालकास सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़

विहितगावमध्ये चंदन वृक्षाची चोरी
नाशिक : विहितगाव येथील हांडोरे मळ्यातील आठ ते दहा वर्षांपूर्वीचे चंदनाचे झाड चोरट्यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास चोरून नेले़ या प्रकरणी नागरी क्षेत्र वृक्षतोड अधिनियम १९६४ च्या ३/४ अन्वये उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

मंगल कार्यालयातील वृक्षतोड प्रकरणी गुन्हा
नाशिक : महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता पंचवटीतील सीतागुंफा रोडवरील निर्मल मंगल कार्यालयातील चार झाडे तोडल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रिडीक्शन प्रोटेक्शन कंट्री ॲक्ट १९७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Single post (crime)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.