सिंगल जोड
By Admin | Updated: September 11, 2015 21:25 IST2015-09-11T21:25:00+5:302015-09-11T21:25:00+5:30
इकरा उर्दू हायस्कूलमध्ये निबंध स्पर्धा

सिंगल जोड
इ रा उर्दू हायस्कूलमध्ये निबंध स्पर्धाजळगाव- इकरा उर्दू हायस्कूल प्रताप नगर मध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले़ पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला़ शेख लुईजा माहिन वाजिद, मोहंमद जजलान शेख हारून, सामिया नाज शेख अब्दूल तालिब, लूईजा नदिम इकबाल, इलियास शेख नूर, आयेशा सिद्दीकी मोहंमद इस्तेयाक यांनी स्पर्धेत यश मिळविले़ माझे आवडते शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाची भूमिका याविषयावर त्यांनी निबंधलेखन केले़ प्रभाग क्रमांक २२ मध्ये स्वच्छता अभियानजळगाव- मनसेतर्फे ११ रोजी प्रभाग क्रमांक २२ मधील कोल्हे वाडा, तेली चौक, गोपाळ पुरा, भाग्यलक्ष्मी चौक, विठ्ठल पेठ परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले़ नगरसेवक खुशबू बनसोडे, अनंत जोशी, राजु पाटील, स्वप्नील भंगाळे आदींनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले़दूधसंघ कर्मचारी संघटनेकडून खडसे यांचा सत्कारजळगाव- जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंदाकीनी खडसे यांचा दूधसंघ कर्मचारी सेवा संघटनेकडून ११ रोजी सत्कार करण्यात आला़ संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव व्ही़एस़ पाटील, दूधसंघाचे संचालक आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते़ सुवर्णकाम करणार्या कारागिरांना मार्गदर्शनजळगाव- चांदीचे दागिने घडविणार्या असंघटीत कारागिरांसाठी साई सिल्व्हर बहुउद्देशीय संस्थेतर्फे शुक्रवारी रोजगार मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले़ जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील यांनी कारागिरांना मार्गदर्शन केले़ संस्थेचे अध्यक्ष परेश जगताप, उपाध्यक्ष विशाल भोळे, सुनील सोनार यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले़