सिंगल बातम्या

By Admin | Updated: August 26, 2015 00:22 IST2015-08-26T00:22:06+5:302015-08-26T00:22:06+5:30

सोनल दीक्षित यांना पुरस्क ार प्रदान

Single News | सिंगल बातम्या

सिंगल बातम्या

नल दीक्षित यांना पुरस्क ार प्रदान
सोलापूर : दयानंद विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सोनल दीक्षित यांना तेजस्विनी महिला पुरस्क ार ज्येष्ठ लेखिका, समीक्षिका सरोजिनी तारणेकर यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आल़े या कार्यक्रमास अहमदनगर जि़ प़ च्या माजी अध्यक्षा वैशाली विखे-पाटील, खा़ वंदना चव्हाण, नगरसेवक धनंजय जाधव, माजी आमदार कांता नलावडे, कॉसमॉस बँके चे चेअरमन कृष्णकांत गोयल आदी उपस्थित होत़े
लष्कर विभाग गणेशोत्सव मंडळाची रविवारी निवड
सोलापूर : लष्कर विभाग गणेशोत्सव महामंडळाच्या नूतन पदाधिकार्‍यांची आणि अध्यक्षाची निवड 30 ऑगस्ट रोजी होणार आह़े दक्षिण सदर बझारमध्ये हरिनारायण सोनी सार्वजनिक वाचनालयात कार्यकारिणी निवड आयोजित करण्यात आली आह़े इच्छुकांनी विविध पदासाठी 29 ऑगस्टपर्यंत नाव नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आह़े
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना फी माफी देण्याची मागणी
सोलापूर : राज्यात पाऊस झालेला नसून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफी देण्याची मागणी महाराष्ट्र ओबीसी फ्रंटने निवास उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आह़े तसेच ओबीसीची जनगणना करावी, ओबीसीसाठी मंत्रालय सुरु करावे अशा विविध मागण्या अँड़ राजन दीक्षित यांच्याकडे करण्यात आल्या़
हर्षद निंबाळकर यांचा सत्कार
सोलापूर : महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलच्या नूतन चेअरमनपदी अँड़ हर्षद निंबाळकर यांची निवड झाली़ सोलापूर जिल्हा न्यायालय वकील संघाच्या वतीने निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर मनोज पामूल, अँड़ शिवशंकर घोडके, अँड़ व्ही़ सी़ दरगड, अँड़ मोहन यल्ला, अँड़ लक्ष्मीकांत कोंडा, अँड़ मिलिंद थोबडे, अँड़ सुरेश बिराजदार आदी उपस्थित होत़े

Web Title: Single News