सिंगल न्यूज
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:32+5:302015-09-07T23:27:32+5:30
शिक्षक दिन उत्साहात

सिंगल न्यूज
श क्षक दिन उत्साहातअहमदनगर : महिला मंडळ बालक मंदिर शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी आपल्या हक्कांपेक्षा कर्तव्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय आदर्श शिक्षक प्रकाश गरड यांनी केले. यावेळी ज्योती केसकर,स्नेहा देशमुख, ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ, नंदा हासे आदी उपस्थित होते. .............रेफ्रिजरेटर भेट अहमदनगर : अशोक फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेट वस्तू देण्याऐवजी त्याच रकमेतून तारकपूर येथील महिला विकास व शैक्षणिक केंद्रास रेफ्रिजरेटर भेट दिला. यावेळी अभिजीत रेखी, ऋतुजा कु लकर्णी, श्रेया जोशी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. .........मोफत नेत्र शिबिर अहमदनगर : नागरदेवळे येथे संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त फिनिक्स फाऊंडेशनच्यावतीने व अहमदनगर नाभिक महामंडळ यांच्यावतीने मोफत नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे. हे शिबिर संत सावता महाराज मंदिरात होणार आहे. या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरूडे यांनी केले आहे. .........टँकरची गर्दी अहमदनगर : शहरातील तपोवन रस्त्यावर सरकारी पाण्याचे टँकर भरण्यासाठी पाण्याचा उद्भव आहे. या ठिकाणी दररोज पाणी भरण्यासाठी गर्दी होत आहे. दुष्काळाची तीव्रता वाढल्याने टँकरची संख्या वाढली आहे. येथून भरण्यात येणारे पाण्याचे टँकर नगर तालुक्यात वितरीत करण्यात येत आहेत. यासह वसंत टेकडी येथून देखील सरकारी पाण्याचे टँकर भरण्यात येत आहे. ............गाळाचा उपसाअहमदनगर : तालुक्यातील पिंपळगाव माळवीच्या तलावातून चार वर्षापासून गाळाचा उपसा सुरू आहे. यंदाही त्यात खंड पडलेला नाही. चार वर्षापूर्वी राज्य सरकारने येथून शेतकर्यांना गाळ उपसा करण्यास परवानगी दिलेली आहे. ती परवानगी आजही कायम आहे. चार वर्षापासून गाळाचा उपसा झाल्याने या तलावाची क्षमता दुप्पट झाली आहे. .................आवेज शेखची निवडअहमदनगर : व्ही.आर.डी.ई. येथील केंद्रीय विद्यालयाचा विद्यार्थी आवेज शेख याची १४ वर्षे वयोगटातील स्पीड स्केटींग स्पर्धेसाठी राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. ही स्पर्धा १३ तारखेला दिल्लीला होणार आहे. यावेळी शेख राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. त्याला प्राचार्या सविता यादव यांचे मार्गदर्शन लाभले. ...............