सिंगल न्यूज
By Admin | Updated: August 28, 2015 00:30 IST2015-08-28T00:30:54+5:302015-08-28T00:30:54+5:30
कुंभार समाजाची

सिंगल न्यूज
क ंभार समाजाची रविवारी बैठक सोलापूर: सोलापूर जिल्हा कुंभार समाजाची बैठक रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता टाकळीकर मंगल कार्यालयात होणार असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष भीमाशंकर म्हेत्रे यांनी कळविले आहे. बैठकीत संघटनेची नवीन कार्यकारिणी निवड व अन्य विषयावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीला समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य संघटक अजित टाकळीकर, तुकाराम कुलाल, गुरुलिंग कुंभार यांनी केले आहे. प्राध्यापक संघटनेची रविवारी वार्षिक सभासोलापूर: सोलापूर शहर जिल्हा ज्युनिअर कॉलेज प्राध्यापक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (30 ऑगस्ट) रोजी दुपारी 12.30 वाजता रावजी सखाराम महाविद्यालय, सम्राट चौक येथे आयोजित केली आहे. या सभेत प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे जिल्हाध्यक्ष प्रा. विलास मोरे, जन. सेक्रेटरी प्रा. प्रकाश भोसले यांनी केले आहे.सुमतीबाई स्कूलमध्ये विद्यार्थी परिवहन समितीसोलापूर: येथील सुमतीबाई इंग्लिश स्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित होण्यासाठी परिवहन समितीची स्थापना करण्यात आली. यावेळी वाहतूृक निरीक्षक जयर्शी झिने, पोलीस प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांची शालेय परिसरातील सुरक्षितता यावर मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापिका रत्नर्शी तळे, स्वाती कांबळे, वाहतूक निरीक्षक जयर्शी झिने, परविंदरसिंग साहोटा, प्रभाकर जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.चारा छावणी टँकर सुरु करासोलापूर: जिल्?ात दुष्काळी स्थितीमुळे पाणी आणि चारा टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून चारा छावणी व पाण्याचे टँकर सुरु करावेत, अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. पाणी आणि चारा नसल्यामुळे जनावरे कत्तलखान्याकडे जात आहेत. उजनीतून पाणी सोडून शेतकर्यांना दिलासा द्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. या निवेदनावर प्रशांत गिड्डे, रवी शिंदे, उमेश रसाळकर, युवराज चुंबळकर , प्रशांत इंगळे आदी पदाधिकार्यांच्या स?ा आहेत.फॅन्सी ड्रेस स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसादसोलापूर: हॅपी डेज स्कूलतर्फे चिमुकल्यांसाठी घेतलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिमुकल्यांनी स्वातंत्र्यसेनानी, शेतकरी, पोलीस, सैनिक अशा विविध वेशभूषा सादर केल्या. या उपक्रमासाठी राजेश जाधव, सचिन राठोड, विद्या मणुरे, मुख्याध्यापिका वैशाली साबळे, नरेंद्र दारा, अजय बुरा, पल्लवी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.संभाजी ब्रिगेडच्या शाखेचा शुभारंभसोलापूर: वसंतविहार जुना पुणे नाका येथे जिजाऊ ब्रिगेडच्या नवीन शाखेचे उद्घाटन राज्याच्या उपाध्यक्षा नंदाताई शिंदे, जिल्हाध्यक्षा लताताई ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. शाखेच्या अध्यक्षपदी मोहिनी चटके, सचिवपदी मनोरंजना आणि कार्याध्यक्षपदी विनिता भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली. सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजनसोलापूर: आनंदर्शी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि. 30 ऑगस्ट) सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, डफरीन चौक येथे हस्ताक्षर सुलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी आहे. याचवेळी विजेत्यांच्या पारितोषिक वितरण समारंभात गुणवंत शिक्षिका पुरस्कार वितरण होईल. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. र्शुतिर्शी वडकबाळकर उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्षा डॉ. माधवी रायते यांनी केले आहे. समूहगीत स्पर्धेचे आयोजनसोलापूर: जिल्हा राष्ट्रभाषा प्रचार समिती, नागेश करजगी युथ फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी 29 सप्टेंबर रोजी हिंदी समूहगान स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सकाळी 10 वाजता होणार आहे. विजेत्यांना 2501, 2001, 1501 अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिके व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.‘लोकमंगल’तर्फे सामूहिक रक्षाबंधनसोलापूर: लोकमंगल परिवारातर्फे नीलमनगर, विनायक नगर, बोळकोटे नगरासह परिसरात शनिवारी 500 भगिनी सामूहिक रक्षाबंधन उत्सव साजरा करणार आहेत.