सिंगल मस्ट
By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:29+5:302015-02-06T22:35:29+5:30
घरेलू कामगार पेन्शन परिषद ९ ला

सिंगल मस्ट
घ ेलू कामगार पेन्शन परिषद ९ ला नागपूर : विदर्भ मोलकरीण संघटनेच्यावतीने सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी घरेलू कामगार पेन्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती रोडवरील विनोबा विचार केंद्रात सकाळी ११.३० वाजता या परिषदेचे उद्घाटन होईल. परिषदेला विदर्भ मोलकरीण संघटनेच्या डॉ. रूपा कुळकर्णी, असुरक्षित कष्टकरी संघर्ष समितीचे डॉ. बाबा आढाव, कार्यवाह सुभाष वारे, सचिव विलास भोंगाडे उपस्थित राहतील. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा उद्या सत्कारनागपूर : महाराष्ट्र आर्य वैश्य समाजाच्यावतीने रविवारी ८ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात येणार आहे. बजाजनगर चौक येथील वासवी कन्यका लॉन येथे सायंकाळी ७ वाजता सत्कार होईल. त्याचबरोबर आ. समीर कुणावार, मदन येरावार, चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार यांचाही सत्कार करण्यात येईल. झाडे कुणबी समाजाचा विदर्भस्तरीय मेळावा उद्यानागपूर : झाडे कुणबी समाजातर्फे रविवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता हुडकेश्वर रोडवरील सेंट पॉल हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज येथे विदर्भस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात उपवर-वधूंचा परिचयही होणार आहे. मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. नाना पटोले, आ. सुधाकर कोहळे उपस्थित राहतील. लोहार समाज संघटनेचा परिचय मेळावा उद्यानागपूर : विश्वकर्मा जयंतीनिमित्त लोहार समाज संघटनेतर्फे रविवार, ८ फेब्रुवारी रोजी उपवर-वधू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बेलतरोडी मार्गावरील लोहार समाज भवनात हा मेळावा होईल. मेळाव्याला उद्योगपती बी. एस. पाटणकर, सदाशिव हिवलेकर, समाजाचे सचिव तुकाराम पराळे उपस्थित राहतील. विभागीय लोकशाही दिन ९ लानागपूर : विभागीय लोकशाही दिन सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त अनुपकुमार हे जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी ऐकणार आहेत. तक्रारकर्त्यांनी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, लोकशाही दिनाच्या टोकनाची प्रत, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तराची प्रत, या सर्व प्रतीचे स्वतंत्र दोन संच घेऊन सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत उपस्थित रहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.