सिंगल - मोठी

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:09+5:302014-12-20T22:28:09+5:30

रिपाइं (खोब्रागडे) गटाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Single - Large | सिंगल - मोठी

सिंगल - मोठी

पाइं (खोब्रागडे) गटाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
नागपूर : निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही मुद्यावर समझोता करून भाजपाला समर्थन दिले होते. यासंदर्भात भाजप आणि रिपाइंची संयुक्त पत्रपरिषदही झाली होती. आता भाजप-सेनेचे सरकार आले आहे. निवडणुकीपूर्वी रिपाइंला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील रामटेके यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्याची भेट घेऊन, निवेदनाच्या माध्यमातून आश्वासनाची आठवण करून दिली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागण्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे रामटेके यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

०-०-०-०-०-०-०-०००-०
पणन संचालनालयाच्या निर्णयाविरोधात अडते आक्रमक
नागपूर : पणन संचालकांनी अडत पद्धती बंदीचा एकतर्फी निर्णय घेऊन, या निर्णयाचा फॅक्स सर्व बाजार समित्यांना पाठविला आहे. राज्यातील ३४६ बाजार समित्यांमध्ये कार्यरत अडत्यांनी या निर्णयाचा विरोध केला असून, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल सेनाड यांच्या नेतृत्वात अडते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. कृषी विपणनामध्ये अडत्यांचा विशेष सहभाग असून, अडतीया हा शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव मिळावा याकरिता सतत प्रयत्नशील असतो. पणन संचालकांनी हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटतील, अशा इशारा अतुल सेनाड यांनी पत्रपरिषदेत दिला. यावेळी सारंग वानखेडे, सचिन क्षीरसागर, नरेश जिभकाटे, रामदास गजापुरे, सचिन अतकर आदी उपस्थित होते.

Web Title: Single - Large

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.