सिंगल क्राईम बातम्या...

By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:39+5:302015-08-03T22:26:39+5:30

साडभाऊने पैसे न दिल्याने आत्महत्येचा प्रयत्न

Single Crime News ... | सिंगल क्राईम बातम्या...

सिंगल क्राईम बातम्या...

डभाऊने पैसे न दिल्याने आत्महत्येचा प्रयत्न
सोलापूर : साडभाऊने हातउसने घेतलेले पैसे परत न दिल्याने सुधीर बाबुराव चव्हाण (वय ४२, रा. उत्तर कसबा) या इसमाने राहत्या घरी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारी सायंकाळी ५ वा. घडला. पत्नी मनीषा यांनी उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.
आजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या
सोलापूर : कावीळ या आजाराला कंटाळून विश्वास साहेबराव आडगळे (वय ३0, रा. इस्तापित, पंढरपूर) या तरुणाने स्वत:च्या पोटावर ब्लेडने वार करून घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी सकाळी ६ वा. घडला. याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.
कर्जाला कंटाळून इसमाची आत्महत्या
सोलापूर : सावकाराच्या कर्जाला कंटाळून रवी बाबुराव साळुंके (वय ४५, रा. शिवाजीनगर, बाळे) या इसमाने कंबर तलावात उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी दुपारी ३.३0 वा. उघडकीस आला. रवी साळुंके हा प्रिसिजन कंपनीत ऑपरेटर म्हणून कामास होता. त्याला एका सावकाराचे कर्ज होते. या कर्जासाठी सावकार तो घरी नसताना पत्नीला पैशासाठी ताकीद देऊन गेला होता. हा प्रकार रवी साळुंके याला समजल्यावर तो सावकाराला भेटण्यासाठी म्हणून गेला. मात्र तो पुन्हा घरी परत आलाच नाही. त्याच्या पत्नीने गुरूवारी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली होती. शनिवारी सकाळी रवी साळुंके याचा मृतदेह तलावात तरंगताना आढळून आला. याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.
महिलेचा मोबाईल हिसकावून पळविला
सोलापूर : विशालनगर विजापूर रोडवर सॅमसंग मोबाईलवर बोलत असताना अज्ञात दोन चोरट्यांनी शैलजा भरत शिंदे (वय ३७) यांच्या हातातील १0 हजार किमतीचा मोबाईल हॅन्डसेट चोरून नेला. हा प्रकार दि.३१ जुलै रोजी सकाळी १0 वा. घडला. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.

Web Title: Single Crime News ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.