सिंगल कॉलम बातम्या... जोड...०१
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:07+5:302015-08-02T22:55:07+5:30
प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ

सिंगल कॉलम बातम्या... जोड...०१
प रमाणपत्र मिळविण्यासाठी ग्रामस्थांची धावपळबाम्हणी (रेल्वे) : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयातील कॉम्प्युटर ऑपरेटर वेळेवर कार्यालयात हजर राहात नसल्याने नागरिकांना विविध प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. शासनाने ग्रामपंचायत कार्यालय संगणकीकृत केले असून, तिथे कॉम्प्युटर ऑपरेटरची नियुक्ती केली आहे. शिवाय, विविध प्रमाणपत्र मिळण्याची सोय ग्रामपंचायत कार्यालयात केली आहे. बाम्हणी (रेल्वे) ग्रामपंचायत कार्यालयातील कम्प्यूटर ऑपरेटर कधीच कार्यालयात हजर राहात नसल्याने गैरसोय होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही समस्या सोडविण्याची मागणीही केली आहे. (वार्ताहर)***अवैध दारूविक्रीमुळे नागरिक त्रस्तबाम्हणी (रेल्वे) : उमरेड तालुक्यातील बाम्हणी (रेल्वे) येथे दिवसेंदिवस अवैध दारूविक्रेत्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हे विक्रेते बाहेरगावाहून बाम्हणी येथे येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बहुतांश दारू विक्रेते सायंकाळी गावात येतात. त्यामुळे गावाबाहेर रोज जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. गावात दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने भांडणांचे प्रमाणही वाढत चालले आहे. या प्रकारामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी या अवैध दारूविक्रीला आळा घालून दारूविक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)***