सिंगल कॉलम
By Admin | Updated: February 11, 2015 23:47 IST2015-02-11T23:47:42+5:302015-02-11T23:47:42+5:30
स्काय मैत्री ग्रुपचे आवाहन

सिंगल कॉलम
स काय मैत्री ग्रुपचे आवाहन नागपूर : स्काय मैत्री ग्रुपतर्फे आकाशदर्शन, ग्रहगोलदर्शन, पक्षिनिरीक्षण आदी निसर्गावर आधारित उपक्रमांचे आयोजन संस्थेच्या संस्थापक मैत्री मार्कंडेयवार यांनी केले आहे. प्रामुख्याने मुलांची जिज्ञासा शमविण्यासाठी हा ग्रुप असला तरी सर्व वयाचे लोक यात सहभागी होऊ शकतात. यासाठी खगोलशास्त्रज्ञ प्रमोद जोशी यांचे सहकार्य लाभले असून दुर्बिणीद्वारे गुरू ग्रहाचा अभ्यास सध्या करण्यात येत आहे. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी १०३, बाजीप्रभूनगर, रामनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन मैत्री मार्कर्ंडेयवार यांनी केले आहे. ---------------प्रवास व पर्यटन विभागातर्फे नेचर ट्रेन नागपूर : शहरातील जैवविविधतेचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व ओळखून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पर्यटन विभागातर्फे गोरेवाडा येथे नेचर ट्रेनचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना जैवविविधतेचे दर्शन व माहिती व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. याप्रसंगी निशिकांत जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यात विविध वनस्पतींचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. पक्षी आणि त्यांचे स्थलांतर विषयावरही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. --------ट्युशन क्लास चालविणाऱ्यांना दणका शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांच्या मार्गदर्शनात आणि महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष मनपिया यांच्या नेतृत्वात कबीरनगर, मिरे लेआऊट येथे चालणारे पॉलिटेक्निक क्लासेस व स्नेहा ट्युशन क्लासेस यांचे फुटपाथ व रस्त्यावरील अवैध पार्किंग याविरोधात निदर्शने करण्यात आली. यासंदर्भात पोलिसांना निवेदन देऊन त्यांना वाहतुकीला होणारा अडथळा समजावून सांगण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून हा भाग मोकळा केला. यात संजय तांबे, किशोर विरुळकर, मंगेश खडके, स्वप्नील मुळे यांनी सहभाग घेतला.