सिंगल...
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:28+5:302015-03-06T23:07:28+5:30
भोळे यांची नियुक्ती

सिंगल...
भ ळे यांची नियुक्तीअहमदनगर: शिर्डी येथील वाहतूक शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक अरविंद भोळे यांची कोतवाली पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. त्यांच्याकडे शहर वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. वाहतूक शाखेचा कार्यभार सध्या पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांच्याकडेच आहे.---------नरसुले यांना मुदतवाढअहमदनगर: जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक शहाजी नरसुले यांना उपअधीक्षक (गृह) पदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला होता. मात्र नितीन चव्हाण हे आठ दिवसांच्या रजेवर गेल्यानंतर आजारी असल्याने त्यांनी महिनाभराची रजा वाढवली आहे. या काळात गृह विभागाचा कार्यभार नरसुले पाहत आहेत.---------शिवजयंती बैठकअहमदनगर: शहरातील तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणारी मंडळे, संस्था, संघटना यांचे कार्यकर्ते आणि शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी दिली.-----------------फुले चौकात काम थंडावलेअहमदनगर : महात्मा फुले चौकातील कोठी ते यश पॅलेस रस्त्याचे काम थंडावले आहे. यामुळे वाहनांची कोंडी आणि रस्त्याच्या चढ-उतारामुळे नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. त्यातच दगड-माती, लोखंडी सळया रस्त्यावरच पडल्याने धोकादायक बनल्या आहेत.----------