सिंघम म्हणजे पोलीस नव्हे - पोलीस महासंचालक
By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:07+5:302015-06-25T23:51:07+5:30
औरंगाबाद : सिंघम सिनेमामध्ये दाखविण्यात आलेला पोलीस अधिकार्यासारखे पोलिसांचे कामकाज चालत नाही. सिंघम म्हणजे पोलीस नव्हे तर पोलिसांना कुटुंबापासून दूर राहून १८-१८ तास काम करावे लागते. पोलिसांच्या कामकाजाचे हे खरे स्वरुप पाहायचे असेल तर नागरिकांनी निदान एक दिवस तरी पोलिस लाईनमध्ये जाऊन राहिले पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी केले.

सिंघम म्हणजे पोलीस नव्हे - पोलीस महासंचालक
औ ंगाबाद : सिंघम सिनेमामध्ये दाखविण्यात आलेला पोलीस अधिकार्यासारखे पोलिसांचे कामकाज चालत नाही. सिंघम म्हणजे पोलीस नव्हे तर पोलिसांना कुटुंबापासून दूर राहून १८-१८ तास काम करावे लागते. पोलिसांच्या कामकाजाचे हे खरे स्वरुप पाहायचे असेल तर नागरिकांनी निदान एक दिवस तरी पोलिस लाईनमध्ये जाऊन राहिले पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी केले. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांकरिता युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप ही वक्तृत्व स्पर्धा एमजीएम कॅम्पसमधील रुख्मिणी हॉल येथे गुरुवारी घेण्यात आली. स्पर्धेचे उदघाटन पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अप्पर पोलीस महासंचालक (सीआयडी क्राईम) संजीव कुमार, अप्पर पोलीस महासंचालक (नियोजन) राजेंद्र सिंग, सीआयआयएच्या मराठवाडा विभागाचे चेअरमन श्रीराम नारायण, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी दयाल म्हणाले की, आपल्या देशासमोर आगळेवेगळे प्रश्न आणि आव्हाने आहेत. हे प्रश्न सोडवीत समाजाला पुढे नेण्याकरिता पोलीस विभाग सतत प्रयत्नशील असतो. देशात तरुणांची संख्या अधिक असून १२ वर्षांत ही संख्या वाढतच राहणार आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांना मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. ही बाब लक्षात घेऊन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. ग्रामीण आणि शहरी भागातील दहा शाळांतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. तरुणांना पोलीस दलाचे काम करण्याची संधीकार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यूथ पार्लमेंट चॅम्पियनशिप ही वक्तृत्व स्पर्धेची माहिती दिली. तसेच तरुणांकरिता आयोजित युथ इंटर्नशिपचे उदघाटन पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत होत असल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी पोलीस आणि जनता यांच्यातील दुरावा कमी व्हावा, तसेच पोलीस विभागाचे कामकाज कसे चालते हे पाहण्याची आणि त्यात सहभागी होण्याची संधी तरुणांना देण्यात आली आहे. कार्यक्रमाचे संचालन परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी केले. यावेळी सीआयआयएचे नारायण यांनी मनोगत व्यक्त केले.