शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

लाखोंच्या हृदयाचा ठाव घेणारे गायक भूपेन हजारिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 04:03 IST

उत्तर-पूर्व भारतीय आसाममधील एक बहुमुखी गायक , संगीतकार अशी भूपेन हजारिका यांची ओळख. आसामी भाषेत त्यांनी अनेक सिनेमांची निर्मिती, गीतलेखन, तसेच संगीतही दिले आहे.

नवी दिल्ली- उत्तर-पूर्व भारतीय आसाममधील एक बहुमुखी गायक , संगीतकार अशी भूपेन हजारिका यांची ओळख. आसामी भाषेत त्यांनी अनेक सिनेमांची निर्मिती, गीतलेखन, तसेच संगीतही दिले आहे. त्यांना आसामी संस्कृती आणि संगीत यांची उत्तम जाण होती. ते भारतातील एकमेव असे कलाकार होते की जे स्वत:च गाणे लिहायाचे, संगीतबध्द करायचे आणि गायचेही. त्यांनी कविता लेखन, पत्रकारिता, गायन, चित्रपट निर्मिती सारख्या अनेक क्षेत्रात काम केले.भूपेन हजारिका यांचा जन्म आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील सदिया येथे झाला. हजारिकाचे वडील नीलकांत आणि आईचे नाव होते शांतीप्रिया. त्यांचे वडील आसामच्या शिवसगर जिल्ह्यातील नागरा शहरात रहायचे. भूपेन हजारिका दहा भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. त्यांना संगीताची प्रेरणा त्यांच्या आईकडून मिळाली.हजारिकांनी आपले पहिले गाणे आपल्या बालपणातच लिहिले होते. वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांनी पार्श्वगायनात पदार्पण केले. १९३९ साली वयाच्या बाराव्या वर्षी आसामी चित्रपट ‘इंद्रमालती’मध्ये त्यांनी छोटीशी भूमिका केली व पार्श्वगायनही केले.हजारिका यांनी तेजपूरमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. पुढील शिक्षण त्यांनी गुवाहाटीमध्ये घेतले. १९४२ मध्ये गुवाहाटीच्या त्यांनी कॉटन कॉलेजमधून इंटरमिजिएट पूर्ण केले. १९४६ मध्ये हजारिका यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून पॉलिटीकल सायन्समध्ये एम.ए. पूर्ण केले. यानंतर पुढील शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा निर्णय घेतला. न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पीएचडीची पदवी मिळवली.भुपेन हजारिकांच्या गाण्यांनी लाखो हृदयांना स्पर्श केला आहे. हजरिकाच्या आवाजात ‘दिल हुम हुम करे’ आणि ‘ओ गंगा हो द्रूप की है ह्य हे गीत कोणी ऐकलं असेल तर आजही त्यांच्या स्मृतीत ते कायम असेल.