शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 15:36 IST

कोलंबोहून मुंबईला जाणाऱ्या 'MV WAN HAI 503' या कंटेनर जहाजात मोठा स्फोट झाला. या अपघातात ४ क्रू मेंबर्स बेपत्ता आहेत आणि ५ जण जखमी झाले आहेत.

केरळच्या किनाऱ्याजवळ एका कंटेनर शीपचा मोठा अपघात झाला आहे. समुद्रात कंटेनर वाहतूक करणाऱ्या सिंगापूरचा ध्वज असलेल्या 'MV WAN HAI 503' या  कंटेनर जहाजात स्फोट झाला. हा स्फोट कोचीपासून सुमारे ३१५ किमी पश्चिमेला समुद्रात असलेल्या जहाजाच्या अंडर डेकमध्ये झाला. या स्फोटात चार क्रू मेंबर्स बेपत्ता झाले असून, पाच जण जखमी झाले आहेत. जहाजावर एकूण २२ क्रू मेंबर्स होते आणि हे जहाज कंटेनर्सनी भरलेले होते.

स्फोटानंतर बचाव कार्याला वेग देण्यात आला आहे. घटनास्थळी भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाने तात्काळ मदतीसाठी रवाना झाले. या स्फोटामुळे ५० कंटेनर समुद्रात पडले असल्याचे सांगण्यात आले असून, जहाजावर एकूण ६०० पेक्षा जास्त कंटेनर होते. नौदलाने आपल्या जहाजांसोबत तटरक्षक दलाची तीन जहाजे घटनास्थळी पाठवली आहेत.

स्फोटाचे कारण अस्पष्ट, मदत कार्य सुरूस्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु कंटेनरच्या आतूनच स्फोट झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय नौदलाचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, "कोझिकोडच्या बेपोर किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजात स्फोट झाला आहे. हे जहाज सिंगापूरचे ध्वज असलेले कंटेनर जहाज आहे, ज्याची लांबी २७० मीटर आणि ड्राफ्ट १२.५ मीटर आहे. हे जहाज ७ जून रोजी कोलंबोहून मुंबईसाठी निघाले होते."

बेपत्ता क्रू मेंबर्सचा शोध सुरू असून,  जखमींना तात्काळ प्रथमोपचार दिले जात आहेत. तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान आणि जहाजे घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. तसेच, घटनास्थळी सर्व मदत पुरवली जात आहे. तटरक्षक दलाने घटनावर लक्ष ठेवून बचाव कार्य सुरू केले आहे. याशिवाय, जहाजावरील उर्वरित क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे. 

टॅग्स :AccidentअपघातKeralaकेरळ