सिंंगल न्यूज

By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:51+5:302015-02-14T23:50:51+5:30

पारितोषिक वितरण (फोटो सह)

Singal News | सिंंगल न्यूज

सिंंगल न्यूज

रितोषिक वितरण (फोटो सह)
अहमदनगर : आय. एम.एस. संस्थेच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन आग्नेयम २०१५ स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ राजेश पेवले यांच्या हस्ते झाले. यावेळी गौतम पाठकी, प्रा. बाळ कांबळे, सरसंचालक डॉ. शरद कोलते, मिरा कुलकर्णी, प्रा. उदय नगरकर, डॉ. ए.आर. मंचरकर आदी उपस्थित होते.
डोंगरगणला महाशिवरात्री :
अहमदनगर : तालुक्यातील डोंगरगण येथे महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी असणार्‍या रामेश्वर महादेव मंदिरात मंगळवारी अभिषेक आणि त्यानंतर प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी रात्रौत्सव होणार असल्याची माहिती देवस्थानच्यावतीने देण्यात आली.
....................
रस्त्यांची पॅचिंग
अहमदनगर : सावेडी जॉगिंग पार्क शेजारी असणार्‍या सर्वच रस्त्यांची पॅचिंग करण्यात येत आहे. या ठिकाणाहून गुलमोहर रोड, कृपाल आश्रम आणि प्रोफेसर कॉलेनीकडे जाणार्‍या रस्त्यांची दुरावस्था झाली होती. पॅचिंगमुळे नागरिकांची सोय होणार आहे.
....................
मुरूमाचा उपासा
अहमदनगर : पिंपळगावच्या तलावातून चार वर्षापूर्वी गाळ उपसा करण्यास सुरूवात करण्यात आला होता. तेव्हापासून या ठिकाणी गाळासोबत मुरूमाचा उपसा करण्यात येत आहे. महसूल प्रशासनाने हा उपसा तातडीने बंद करण्याची मागणी होत आहे.
.................
गटारी योजनेची मागणी
अहमदनगर : शहरातील निर्मलनगर, तपोवन परिसारात मनपाने गटार योजना राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या ठिकाणी गटार योजना नसल्याने या ठिकाणी राहणार्‍या नागरिकांच्या सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सावेडी भुयारी गटार योजनेत या भागाचा समावेश असणे आवश्यक आहे.
.....................

Web Title: Singal News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.