शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

‘अदानी’ पडझडीपासून सरकारने झटकले हात, विरोधकांच्या गदारोळात संसदेचे कामकाज स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 08:05 IST

Adani: ‘अदानी‘ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी करत, विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ केल्याने  संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

नवी दिल्ली : ‘अदानी‘ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी करत, विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ केल्याने  संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. सरकारचा अदानी समभाग पडझडीशी काहीही संबंध नाही, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला प्राधान्य असते, विरोधकांकडे दुसरा मुद्दा नाही, असे मत संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केले.

लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजता सुरू झाले तेव्हा काँग्रेस, द्रमुकसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अदानी समूहावरील हिंडेनबर्ग संशोधन अहवाल आणि त्यासंबंधित घडामोडींवरून व्यासपीठाजवळ घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या संदर्भात संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी विरोधी पक्षांचे सदस्य करत होते. 

विरोधी पक्षांच्या बैठकीत सखोल चौकशीची मागणीकाँग्रेस व इतर १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शुक्रवारी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात बैठक घेतली. द्रमुक, आम आदमी पार्टी, भारत राष्ट्र समिती, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल (युनायटेड) व इतर अनेक पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. विरोधी पक्षांनी अदानी समूहाशी संबंधित प्रकरणात संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे.

‘हिंडेनबर्ग’वरून काळजीचे कारण नाही : अर्थमंत्रीसेबी आणि आरबीआय चाैकशी करतील : जेठमलानीभाजप खासदार महेश जेठमलानी यांनी शुक्रवारी अदानी समूहात भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) केलेली गुंतवणूक सरकारच्या इशाऱ्यावर केल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले, या प्रकरणाची जेपीसीमार्फत चौकशी करण्याची मागणी समर्थनीय ठरू शकत नाही. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) या गुंतवणुकीमध्ये अनियमितता असल्यास चौकशी करतील. त्याच्याशी सरकारचा काय संबंध, असेही त्यांनी विचारले.

काळजी करण्याचे कारण नाही. ही एक घटना असून त्याबाबत जगभर चर्चा सुरू आहे. मात्र, भारतीय बाजार कसा नियंत्रित हाेताे, हे यावरून स्पष्ट हाेत नाही. एलआयसी, एसबीआय यांची गुंतवणूक किंवा कर्ज मंजूर केलेल्या मर्यादेतच आहे.     - निर्मला सीतारामन, अर्थमंत्री  पीठासीन सभापती राजेंद्र अग्रवाल यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होऊ देण्याची विनंती केली. गदारोळ न थांबल्याने त्यांनी काही मिनिटांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी टाॅप २०मधून बाहेरअमेरिकन शेअर बाजारातून ‘अदानी’चे समभाग बाहेर

टॅग्स :AdaniअदानीCentral Governmentकेंद्र सरकार