साधेभोळे लोक लोभापोटी अडकले - सीबीआयप्रमुख

By Admin | Updated: December 14, 2014 01:27 IST2014-12-14T01:27:51+5:302014-12-14T01:27:51+5:30

साधेभोळे गुंतवणूकदार केवळ आपल्या लोभामुळे फसव्या योजनांच्या जाळ्यात अडकले, असे मत सीबीआयप्रमुख अनिल सिन्हा यांनी शनिवारी व्यक्त केले आहे.

Simple people get stuck on Lohapapoti - CBI chief | साधेभोळे लोक लोभापोटी अडकले - सीबीआयप्रमुख

साधेभोळे लोक लोभापोटी अडकले - सीबीआयप्रमुख

नवी दिल्ली : साधेभोळे गुंतवणूकदार केवळ आपल्या लोभामुळे फसव्या योजनांच्या जाळ्यात अडकले, असे मत सीबीआयप्रमुख अनिल सिन्हा यांनी शनिवारी व्यक्त केले आहे. शारदा चिटफंडसारख्या फसव्या गुंतवणूक योजनांमध्ये पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन राज्यांमधील जवळपास 25 लाख लोकांना आपला पैसा गमवावा लागला आहे.
‘या घोटाळ्याचा तपास सीबीआय करीत नाही यासाठी ते (गुंतवणूकदार) दु:खी नाहीत तर दुस:याच कारणावरून ते दु:खी आहेत’, असे सिन्हा म्हणाले. अशाप्रकारच्या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी सीबीआयला स्वत:हून पुढाकार घेता येईल आणि सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा करावी लागणार नाही यासाठी एखादे धोरण असले पाहिजे काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. सिन्हा म्हणाले, आपल्याला या देशातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचे असेल तर आधी आपल्यातील लोभाविरुद्ध लढणो गरजेचे आहे. साधेभोळे लोक आपल्या लोभामुळेच अशा फसव्या योजनांमध्ये अडकतात.
आम्हाला भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी आधी स्वत:च्या मनावर ताबा मिळवावा लागेल. अशा घोटाळ्यांचा तपास करणा:या अन्य संस्थांच्या कामात आपण हस्तक्षेप करणार नाही. शारदा घोटाळ्याच्या तपासात सत्यस्थिती आणि पुरावे यांच्या आधारावरच पावले उचलण्यात आली आहेत, असे सिन्हा म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Simple people get stuck on Lohapapoti - CBI chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.