सिल्लोड डायरेक्ट

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:21+5:302015-02-14T23:51:21+5:30

कुंभमेळ्यात भीक मागण्यासाठी मुलांचे अपहरण

Sillod Direct | सिल्लोड डायरेक्ट

सिल्लोड डायरेक्ट

ंभमेळ्यात भीक मागण्यासाठी मुलांचे अपहरण
अपहरणकर्त्यांचा सिनेस्टाईल थरार प्रकरण : आरोपी पोलिसांच्या ताब्यात
सिल्लोड : शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न करून सिनेस्टाईल थरार दाखविणार्‍या तिन्ही आरोपींना घाटीत उपचार करून अजिंठा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता कुंभमेळ्यात भीक मागण्यासाठी मुलांचे अपहरण करीत असल्याची खळबळजनक माहिती समोर येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले; मात्र पोलिसांनी मानवी व्यापार होतो का? या बाजूनेही तपास सुरू केला आहे.
दरम्यान, संतप्त जमावाने आरोपींची कार जाळल्यामुळे काही पुरावेही नष्ट झाल्याचा संशय पोलिसांना आहे. सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरात शुक्रवारी तीन अपहरणकर्त्यांनी सिनेस्टाईल थरार केला. शिवन्याच्या जि.प. उर्दू हायस्कूलमधील आठव्या वर्गातील शेख अमीर शेख खलील याला शाळेतून चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला होता; पण त्यांचा प्रयत्न फसला. यानंतर त्या अपहरणकर्त्यांनी पळ काढला व एका मोटारसायकलला उडविले. त्यात एक इसम ठार झाला होता. त्यानंतर कार उलटली. त्यामुळे या आरोपींना जमावाने पकडून बेदम चोप दिला होता. यात आरोपी मनोज रामचंद्र निंबाळकर, दिलीप शामराव निंबाळकर (दोघे रा. बाळापूर, जि. अकोला)व निसार सनातुल्ला मुलतानी (रा. पीरबावडा, ता. फुलंब्री) हे जखमी झाले होते. त्यांना घाटीत दाखल करण्यात आले होते. शनिवारी पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले व कसून चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Sillod Direct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.