दलितांच्या हत्येवर मौन का?
By Admin | Updated: October 25, 2015 23:34 IST2015-10-25T23:34:10+5:302015-10-25T23:34:10+5:30
हरियाणातील दलितांच्या हत्यांवर बोलण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वारस्य नाही. याउलट ब्रिटनच्या नियोजित दौऱ्याबाबत बोलताना ते थकत नाहीत

दलितांच्या हत्येवर मौन का?
नवी दिल्ली : हरियाणातील दलितांच्या हत्यांवर बोलण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वारस्य नाही. याउलट ब्रिटनच्या नियोजित दौऱ्याबाबत बोलताना ते थकत नाहीत, अशा शब्दांत काँग्रेसने रविवारी मोदींवर हल्ला चढवला. मोदींच्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस प्रवक्ते आरपीएन सिंह यांनी त्यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले. जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव यावर बोलण्याऐवजी मोदींनी आपल्या कार्यक्रमात ब्रिटनच्या दौऱ्यावर बोलणे पसंत केले.