शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचं थैमान! सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 14:48 IST

मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी मिंटोकगुंग येथे एका उच्चस्तरीय बैठक घेतली.

सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात संततधार पावसाने झालेल्या भूस्खलनामुळे १५ परदेशी नागरिकांसह १२०० हून अधिक पर्यटक अडकले आहेत. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. राज्यात भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. 

मिळलेल्या वृत्तानुसार, जवळवास १२०० हून अधिक पर्यटक हे मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकून पडले आहेत. सिक्कीम पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे प्रधान सचिव सी एस राव यांनी एका निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. मंगन जिल्ह्यातील लाचुंगमध्ये भारतातील तीन, बांगलादेशातील १० जण अडकले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक 

मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी मिंटोकगुंग येथे एका उच्चस्तरीय बैठक घेतली. डोंगराळ राज्याला भूस्खलनाचा मोठा फटका बसला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी अडकलेल्या पर्यटकांना आहेत त्याठिकाणी थांबा आणि धोका पत्करू नका असं सांगितलं आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अडकलेल्या सर्व पर्यटकांसाठी रेशनचा पुरेसा साठा आहे. हवामानाच्या परिस्थितीनुसार सर्व पर्यटकांना हवाई मार्गाने आणण्यासाठी मुख्य सचिव कार्यालयाने केंद्राशी बोलणी सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. मंगनमधील जिल्हा प्रशासन, पोलीस आणि पर्यटन अधिकारी यांच्याशी समन्वय साधून अडकलेल्या लोकांची सुटका करत आहे. 

अनेक घरं गेली पाण्याखाली

आणखी एका अधिकाऱ्याने सांगितलं की, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालं ज्यामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली, नुकसान झालं, तर विद्युत खांब वाहून गेले. संततधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. संगकलांग येथे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांधलेला पूल कोसळला, ज्यामुळे उत्तर सिक्कीममध्ये मोठ्या संख्येने पर्यटक अडकले.  

टॅग्स :sikkimसिक्किमfloodपूरRainपाऊस