शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

संसदेवर खलिस्तानी ध्वज फडकवा अन् १ कोटींचं बक्षीस मिळवा!, खलिस्तानी संघटनेची जाहिरातबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 15:57 IST

सिख फॉर जस्टिस (SFJ) नावाच्या खलिस्तानी संघटनेच्या भारत विरोधी कारवाया काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर आता पुन्हा एकदा खलिस्तानी संघटना सक्रीय झाल्या आहेत.

जिनेव्हा-सिख फॉर जस्टिस (SFJ) नावाच्या खलिस्तानी संघटनेच्या भारत विरोधी कारवाया काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर आता पुन्हा एकदा खलिस्तानी संघटना सक्रीय झाल्या आहेत. शेतकरी आंदोलक सरकार विरोधात संसदेवर ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करणार आहेत. पण त्याआधीच सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानं आंदोलक शेतकऱ्यांमध्ये आंदोलनाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आता आंदोलक शेतकऱ्यांना लालुच दाखवण्यासाठी खलिस्तानी संघटनेनं संसदेवर आयोजित मोर्चाच्या दरम्यान संसदेवर खलिस्तानी ध्वज फडकवल्यास बक्षीस जाहीर केलं आहे. 

राजधानी दिल्लीच्या सीमांवर गेल्या अनेक महिन्यांपासून ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलकांकडे खलिस्तानी संघटनेनं देग-तेग फतेह रॅली काढण्याचं आवाहन केलं आहे. भारताहून हजारो किमी दूरवर बसून पंजाबला भारतापासून वेगळं करण्याचं स्वप्न खलिस्तानी संघटना पाहात आहेत. यासाठी दररोज काही ना काही कारवाया रचण्याचा प्रताप संघटनेकडून केला आहे. याच संदर्भात आता २९ नोव्हेंबर रोजी आयोजित मोर्चात संसदेवर खलिस्तानी ध्वज फडकवणाऱ्याला १,२५,००० अमेरिकी डॉलरचं ( जवळपास १ कोटी रुपये) बक्षिस दिलं जाईल असं जाहीर केलं आहे. 

गुरपतवंत सिंग पन्नू यांनी आग ओकलीसिख फॉर जस्टिसचे (SFJ) सल्लागार गुरपतवंत सिंह पन्नू (Gurpatwant Singh Pannun) यांनी  जिनेव्हातून एक व्हिडिओ मेसेज शेअर केला आहे. "भगत सिंग यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संसदेवर बॉम्बहल्ला केला होता. आम्ही तर फक्त पंजाबच्या स्वातंत्र्यासाठी शेतकऱ्यांना खलिस्तानी ध्वज फडकवण्याचं आवाहन करत आहोत", असं गुरपतवंत सिंग यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरी