शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मुसेवाला प्रकरण: तिहारमधून रचला हत्येचा कट; बिश्नोई गँगवर संशय, न्यायालयीन चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 07:52 IST

घटनेच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे.

- बलवंत तक्षकचंडीगड : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. मुसेवाला यांच्या गाडीवर ३० गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई या गँगस्टरच्या गटाने घेतली आहे. तिहार तुरुंगातून त्याने कट शिजविल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

या घटनेच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. मात्र, मुसेवाला यांच्या वडिलांनी सीबीआय किंवा एनआयएकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. पंजाब पोलिसांनी याप्रकरणी उत्तराखंडमधून ६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक जण बिश्नोई गँगचा शार्प शूटर असल्याचे सांगण्यात येत आहे. हत्या झाली त्या ठिकाणाहून गोळ्यांची ३० काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. 

मुसेवाला यांनी दिले होते संकेत मुसेवाला यांनी यापूर्वीच आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. मुसेवाला यांची दोन गाणी द लास्ट राइड आणि २९५ लगेगी सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या गाण्याच्या टायटलमध्येच त्यांच्या मृत्यूचा अलर्ट होता. या गाण्याचे बोल होते सच बोलेंगा तो २९५ लगेगी. २९ तारीख आणि पाचवा महिना. म्हणजेच, २९ मे रोजीच त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या गाण्याचे टायटल होते लास्ट राइड. या गाण्यात त्यांनी ‘थार’ वाहनाचा उल्लेख केला होता. त्याच वाहनातून जाताना त्यांच्यावर हल्ला झाला. या गाण्याला १५ दिवसांत एक कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.

तिहारमधून हत्येचा कट रचल्याचा संशयलॉरेन्स बिश्नोई सध्या तिहार तुरुंगात कोठडीत आहे. त्याने कॅनडातील सहकारी गोल्डी ब्रार याच्या साथीने मुसेवाला यांच्या हत्येचा कट रचल्याचा पंजाब पाेलिसांना संशय आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने लॉरेन्स व इतर काही जणांची चौकशीही केली.

काँग्रेसची निदर्शने मुसेवाला यांच्या हत्येच्या निषेधार्थ दिल्ली प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराजवळ निदर्शने केली आणि मुसेवाला यांच्या हत्येला आप जबाबदार असल्याचा आरोप केला. मुसेवाला यांची सुरक्षा कमी का करण्यात आली? असा सवाल काँग्रेसने केला आहे. 

सिद्धू यांचे वडील म्हणाले, गोळीबार होताना पाहिला पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपल्या मुलाला वसुलीसाठी गँगस्टरकडून जीवे मारण्याची धमकी मिळालेली होती. रविवारी मला जेव्हा समजले की, सिद्धू हे सुरक्षा रक्षक न घेता घरातून निघाले आहेत, तेव्हा मी सुरक्षा रक्षकांसह सिद्धू यांच्या पाठीमागे गेलो. घटनास्थळी एक कार मी पाहिली. यात चार लोक बसलेले होते. ते मुसेवाला यांच्या जीपचा पाठलाग करत होते. पुढे मुलाच्या जीपसमोर अन्य एक वाहन येऊन थांबले. या वाहनातील लोकांनी मुलावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. 

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाPunjabपंजाब