शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sidhu Moosewala: भगवंत मान यांचा मोठा निर्णय, सिद्धू मुसेवाला यांच्या नावावर कँसर हॉस्पिटल आणि स्टेडियम उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 16:07 IST

Sidhu Moosewala: सिद्धू मूसेवालांची रविवारी हत्या करण्यात आली, त्यानंतर आज मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुसेवालांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

Sidhu Moosewala: काही दिवसांपूर्वी पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर पंजाब सरकारवर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात सिद्धू मूसेवाला यांच्या नावाने कॅन्सर हॉस्पिटल आणि स्टेडियम बांधण्याची घोषणा मान यांनी केली आहे. 

सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. रविवारी मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवाला यांचे कुटुंबीय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय एजन्सीकडे सातत्याने मागणी करत आहेत. मुसेवाला यांच्या हत्येपासून त्यांचे कुटुंबीय भगवंत मान आणि त्यांच्या सरकारवर नाराज आहेत. हत्येच्या एक दिवस आधीच सिद्धू मुसेवालाच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. 

कुटुंबीयांचा सरकारवर आरोपमुख्यमंत्री भगवंत मान मुसेवाला यांच्या मुसा गावात पोहोचेपर्यंत तणावाचे वातावरण होते. मुसा गावातील लोक भगवंत मान यांच्या सरकारवर नाराज आहेत. गावात सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. सरकारने सुरक्षा काढून घेतल्यामुळेच सिद्धू यांची हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. मात्र, या तीव्र विरोधादरम्यान प्रचंड पोलीस बंदोबस्तात भगवंत मान यांनी सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

विरोधकांचा दबावयावेळी भगवंत मान यांनी सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. भगवंत मान यांच्या सरकारने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची शिफारस आधीच केली आहे. या प्रकरणानंतर मान सरकारवर विरोधकही दबाव टाकत आहेत. 

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबcongressकाँग्रेस