शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पैशांसाठी सिद्धूने आईला घराबाहेर काढले, बहिणीचेच गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 07:52 IST

बहीण सुमन यांचा गंभीर आराेप, आई-वडील विभक्त झाल्याचा दावाही खाेटा

लाेकमत न्यूज नेटवर्कचंदीगड : वडिलांच्या मृत्यूनंतर पैशासाठी आपल्या वृद्ध आईला  घरातून हाकलून दिल्याचा गंभीर आराेप पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्याेतसिंग सिद्धू यांच्यावर खुद्द त्यांची माेठी बहीण सुमन तूर यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सिद्धू यांच्यावर आराेप करण्यात आल्यामुळे पंजाबमधील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

सुमन या अमेरिकेत वास्तव्याला आहेत. सध्या त्या चंदिगडमध्ये असून, त्यांनी मुलाखतीमध्ये सिद्धू यांच्यावर गंभीर आराेप केले. त्यांनी सांगितले की, सिद्धू हे क्रूर व्यक्ती आहेत. वडील भगवंत यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी आई निर्मल व मला १९८६ मध्ये घराबाहेर काढले. त्यानंतर एका रेल्वे स्थानकावर आईचा बेवारसपणे मृत्यू झाला. आम्ही त्या काळात अतिशय कठीण प्रसंगांना ताेंड दिले. माझी आई चार महिने रुग्णालयात हाेती. मी जे सांगत आहे त्या सर्व गाेष्टींचे कागदाेपत्री पुरावे आहेत, असे सुमन म्हणाल्या. आई आणि वडिलांनी कायदेशीर पद्धतीने विभक्त झाल्याचा सिद्धू यांचा दावा खाेटा असल्याचे सुमन म्हणाल्या. मी २० जानेवारीला सिद्धू यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने भेटण्यास नकार दिल्याचे त्या म्हणाल्या. पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान हाेणार आहे. 

सिद्धूने मला ब्लाॅक केलेवडील घर, जमीन आणि निवृत्तीवेतनाची रक्कम मागे साेडून गेले. त्या मालमत्तेसाठी सिद्धूने आम्हाला घराबाहेर काढून संबंध ताेडले, असे सुमन म्हणाल्या. आमच्याबद्दल त्यांनी आतापर्यंत सर्व खाेटे सांगितले. त्याने मला ब्लाॅक केले आहे, असेही सुमन यांनी सांगितले.

‘मी त्यांना ओळखत नाही’सिद्धू यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांच्या पत्नी नवज्याेत काैर यांनी संबंधित महिलेला ओळखत नसल्याचे म्हटले आहे. सिद्धू यांचे वडील भगवंत यांना पहिल्या पत्नीपासून दाेन मुली हाेत्या. त्यांना ओळखत नाही, असे नवज्याेत काैर यांनी सांगितले.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२