शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इमामांना पगार, लग्नासाठी पैशांची मदत अन्...; सिद्धरामय्या सरकारच्या अर्थसंकल्पात मुस्लिमांसाठी काय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:20 IST

या अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांसाठी आणि विशेषतः मुस्लिम समुदायासाठीही अनेक मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे.

कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने शुक्रवारी आपला  अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात ७.५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह नवीन औद्योगिक धोरणही जाहीर करण्यात आले. याशिवाय २० लाख नवीन रोजगार निर्मितीचे आश्वासनही देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी अल्पसंख्याकांसाठी आणि विशेषतः मुस्लिम समुदायासाठीही अनेक मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. 

या अर्थसंकल्पात, "मुस्लिम मुलींसाठी १५ महिला महाविद्यालये  सुरू करणार, जी वक्फ बोर्डाच्या रिकाम्या जमिनींवर सरकारकडून उभारली जाणार आहेत. याशिवाय, इतर १६ महिला महाविद्यालयेही सुरू कण्याचीही योजना आहे. याच बरोबर, अल्पसंख्यक कुटुंबांना लग्नासाठी ५०००० रुपयांची आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यासाठी लग्न साध्या पद्धतीने पारपडणे आवश्यक असेल. जर लग्न आलिशान पद्धतीने झाले, तर ही मदत मिळणार नाही.

या अर्थसंकल्पात, इमामांची सॅलरी वाढवून 6 हजार रुपये करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. याशिवाय, जैन पुजारी, शीख ग्रंथींनाही एवढेच वेतन मिळेल. तसेच, सहायक ग्रंथी आणि मशिदीचे मुअज्जिन यांनाही दरमहा ५००० रुपये मानधन दिले जाईल.

या अर्थसंकल्पात बेंगळुरूमधील हज भवनाचा विस्तार करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. येथे हज यात्रेकरू आणि त्यांच्या कुटुंबियांना आधुनिक सुविधा पुरवल्या जातील. त्यांनी केलेली आणखी एक मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री अल्पसंख्याक वसाहत विकास कार्यक्रम सुरू केला जाणार. याअंतर्गत १००० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

याशिवाय, कर्नाटकात 250 मौलाना आझाद मॉडेल इंग्लिश स्कूल सुरू करण्याची घोषणाही करण्या आली आहे. या शाळा सरकारी धोरणांतर्गत सुरू केल्या जातील. त्या आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याची योजना आहे. यासाठी सरकारने ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय, बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीला आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात येईल. हे विद्यापीठाचे आता डॉ. मनमोहन सिंग बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी नावाने ओळखले जाईल.

टॅग्स :Karnatakकर्नाटकBudgetअर्थसंकल्प 2024Muslimमुस्लीमSchoolशाळाcongressकाँग्रेस