शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

टिळेवाल्यांची भीती वाटते! वादग्रस्त वक्तव्यामुळे सिद्धारामय्या सोशल मीडियावर ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 17:24 IST

सतत वादग्रस्त विधाने करून कुठल्या ना कुठल्या वादाला तोंड फोडणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धारामय्या हे  पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

ठळक मुद्देकुंकू आणि भस्माचा लांबलचक टीळा लावणाऱ्या लोकांची भीती वाटते, असे वक्तव्य सिद्धारामय्या यांनी केले या वक्तव्यानंतर सिद्धारामय्या यांच्याविरोधात सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया नेटिझन्सकडून राहुल गांधी यांचा टिळा लावलेला फोटे शेअर करण्यात येत आहे. तर काही जण स्वत:चा टिळा आणि भस्म लावलेला फोटो शेअर करत आहेत

बंगळुरू - सतत वादग्रस्त विधाने करून कुठल्या ना कुठल्या वादाला तोंड फोडणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धारामय्या हे  पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ''कुंकू आणि भस्माचा लांबलचक टीळा लावणाऱ्या लोकांची भीती वाटते, असे वक्तव्य सिद्धारामय्या यांनी केले होते.'' दरम्यान, सिद्धारामय्या यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका होत असून, ट्विटरवर  #SelfieWithTilak चा हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आहे. कर्नाटकमधील बदामी येथे एका सभेला संबोधित करताना सिद्धारामय्या यांनी हे वक्तव्य केले होते. जे लोक कुंकू किंवा भस्माचा लांबलचक टिळा लावतात. त्यांची मला खूप भीती वाटते, असे सिद्धारामय्या यांनी म्हटले होते. दरम्यान, हे वक्तव्य केल्यानंतर सिद्धारामय्या यांच्याविरोधात सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काही नेटिझन्सकडून राहुल गांधी यांचा टिळा लावलेला फोटे शेअर करण्यात येत आहे. तर काही जण स्वत:चा टिळा आणि भस्म लावलेला फोटो शेअर करत आहेत. दरम्यान, दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल बग्गा यांनीही सिद्धारामय्या यांच्यावर टीका केली आहे. ''कंस मालाला टिळ्याची भीती वाटते. आता आज ट्विटरला टिळ्याच्या फोटोंनी  रंगवून टाकूया, टिळा लावलेले फोटो शेअर करूया,''असे आवाहन तेजिंदरपाल बग्गा यांनी केले आहे. सिद्धारामय्या आणि वाद यांचे जुने नाते आहे. याआधी गेल्या महिन्यात सिद्धारामय्या हे एका महिलेला धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र नंतर हे प्रकरण मिटवण्यात आले होते.  

टॅग्स :siddaramaiahसिद्धारामय्याKarnatak Politicsकर्नाटक राजकारणPoliticsराजकारण