शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पहिली दोन वर्षे सिद्धरामय्या, नंतर शिवकुमार मुख्यमंत्रिपदी; काँग्रेस नेतृत्वाने बनविला फॉर्म्युला, दिल्लीत आज बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 06:55 IST

मुख्यमंत्रिपदी कुणाची निवड करावी, याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी रात्री पाठवलेल्या निरीक्षकांनी आमदारांशी चर्चा केली.

आदेश रावल -

नवी दिल्ली : कर्नाटकात मुख्यमंत्रिपदी कोण, याचा फैसला येत्या २४ तासांत होण्याची शक्यता असून, दोन वर्षे सिद्धरामय्या, तर अखेरचे तीन वर्षे डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री होतील, असा फॉर्म्युलाही तयार केला आहे.मुख्यमंत्रिपदी कुणाची निवड करावी, याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी रात्री पाठवलेल्या निरीक्षकांनी आमदारांशी चर्चा केली. याबाबतचा निर्णय खरगे यांच्यावर सोपवल्याचा ठराव मंजूर केला. या फॉर्म्युल्यानुसार मंगळवारी शिवकुमार यांच्यापुढे  प्रस्ताव  मांडला जाईल. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

८५ आमदारांचा सिद्धरामय्या यांना पाठिंबा -  निरीक्षकांनी आमदारांकडून गोपनीय मतदान करून घेतले. यात असे दिसून आले की, सर्वाधिक म्हणजे ८५ आमदारांचे समर्थन सिद्धरामय्या यांना आहे, तर कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना ४५ मते मिळाली आहेत, तर ६ आमदारांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष नेतृत्व घेईल तो निर्णय मान्य असेल. -  सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सोमवारी अहवाल अध्यक्षांना सुपूर्द केला. मंगळवारी ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेतील.

सिद्धरामय्या दिल्लीत, शिवकुमार आज पोहोचणारमुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या सोमवारी दिल्लीत पोहोचले, तर पोटाच्या संसर्गाचे कारण देत कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीचा प्रस्तावित दौरा रद्द केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. परंतु, मंगळवारी सकाळी ते दिल्लीत पोहोचणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.  

 

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatak Politicsकर्नाटक राजकारण