सिकलसेल मार्गदर्शन कार्यशाळा

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:36+5:302014-12-20T22:27:36+5:30

मूर्तिजापूर: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी येथील जवाहर विद्यालयात १७ डिसेंबर रोजी सिकलसेल समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे अध्यक्ष भैयासाहेब देशमुख, मुख्याध्यापक बोळे व इतर शिक्षक उपस्थित होते. तालुका सिकलसेल सहाय्यक अमोल राऊत यांनी उपस्थितांना सिकलसेल आजाराची लक्षणे, उपचार पद्धती, सिकलसेल रुग्णांसाठी असलेले शासकीय लाभ व योजना आदींबाबत मार्गदर्शन केले. सिकलसेल तपासणी शासकीय दवाखान्यांमध्ये मोफत केली जाते. या कार्यशाळेला जवळपास ७०० विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

SickleLail Guidance Workshop | सिकलसेल मार्गदर्शन कार्यशाळा

सिकलसेल मार्गदर्शन कार्यशाळा

र्तिजापूर: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी येथील जवाहर विद्यालयात १७ डिसेंबर रोजी सिकलसेल समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे अध्यक्ष भैयासाहेब देशमुख, मुख्याध्यापक बोळे व इतर शिक्षक उपस्थित होते. तालुका सिकलसेल सहाय्यक अमोल राऊत यांनी उपस्थितांना सिकलसेल आजाराची लक्षणे, उपचार पद्धती, सिकलसेल रुग्णांसाठी असलेले शासकीय लाभ व योजना आदींबाबत मार्गदर्शन केले. सिकलसेल तपासणी शासकीय दवाखान्यांमध्ये मोफत केली जाते. या कार्यशाळेला जवळपास ७०० विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: SickleLail Guidance Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.