सयामी जुळ्या बहिणींनी केले ‘सामाईक’ मतदान
By Admin | Updated: October 28, 2015 22:10 IST2015-10-28T22:10:18+5:302015-10-28T22:10:18+5:30
डोक्यापासून खांद्यापर्यंतची शरीरे एकत्र जोडलेल्या साबा आणि फराह या दोन ‘सयामी’ जुळ््या बहिणींनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत बुधवारी येथे एकाच मतदार ओळखपत्रावर

सयामी जुळ्या बहिणींनी केले ‘सामाईक’ मतदान
पाटणा : डोक्यापासून खांद्यापर्यंतची शरीरे एकत्र जोडलेल्या साबा आणि फराह या दोन ‘सयामी’ जुळ््या बहिणींनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत बुधवारी येथे एकाच मतदार ओळखपत्रावर एकच मतदार म्हणून ‘सामाईक’ मतदान केले.
पाटणा शहरात सामानपूरा भागात राहणाऱ्या साबा आणि फराह या सयामी जुळ््या बहिणींनी त्यांच्या घराजवळच्या मतदान केंद्रावर मतदान केले. साबा व फराह या दोन व्यक्ती असल्या तरी त्यांची शरीरे एकत्रित असल्याने त्यांना कायद्यानुसार एकच व्यक्ती मानून दोघींना मिळून एकच मतदार ओळखपत्र जारी करण्यात आले होते. या दोघींनी या एकाच कार्डावर एकच मतदार म्हणून एकच मत दिले.
दोन स्वतंत्र मने व भावभावना असलेल्या या दोघींना शरीर एकच असल्याने आयुष्यात अनंत यातना व त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे शक्य असल्यास शस्त्रक्रिया करून त्यांना वेगळे केले जावे, यासाठी पुण्यातील एक कायद्याची विद्याथिर्नी आरुषी दशमना हिने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. परंतु शस्त्रक्रिया अत्यंत धोक्याची आहे व त्यामुळे दोघींपैकी एक दगावण्याची भीती आहे, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी दिल्यानंतर न्यायालयाने शस्त्रक्रियेने त्यांना वेगळे करण्याचा विचार सोडून दिला होता. (वृत्तसंस्था)