जिल्ह्यात शाळा बंद आंदोलन शुक्रवारी बहुतांश शाळा होत्या बंद
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30
अकोला - शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होता. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील बहुतांश शाळांच्या कर्मचार्यांनी सहभाग घेतल्याने अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या असून, या आंदोलनाला जिल्ह्यातील विविध संघटनांनीही पाठिंबा जाहीर केला आहे.

जिल्ह्यात शाळा बंद आंदोलन शुक्रवारी बहुतांश शाळा होत्या बंद
अ ोला - शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होता. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील बहुतांश शाळांच्या कर्मचार्यांनी सहभाग घेतल्याने अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या असून, या आंदोलनाला जिल्ह्यातील विविध संघटनांनीही पाठिंबा जाहीर केला आहे.सन २०१३-१४ च्या संच मान्यता तत्काळ रद्द करण्यात याव्या, संच मान्यतेनुसार ज्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांचे समायोजन करण्यात आले त्याचा निषेध या आंदोलनामध्ये करण्यात आला. जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे समायोजन वेगाने करण्यात आले असून, काही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे समायोजन अद्यापही करण्यात आलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. समायोजन न झालेल्या कर्मचार्यांचे ऑनलाइन पद्धतीने तत्काळ देयके पारित करण्यात यावी, शिक्षणसेवकांना संच मान्यतेनुसार सेवा समाप्ती देण्यात आली असून, त्यांना तत्काळ सेवेत रुजू करण्यात यावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची समायोजन प्रक्रिया बंद करण्याची मागणी शाळा बंद आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे. या आंदोलनामध्ये दिलीप कडू, फैयाज अहमद खान, पी.जे. राठोड, गोपाल सांगूनवेढे, प्रवीण ठाकरे, सुनील सावीकर, विजय चव्हाण यांच्यासह शिक्षकांचा सहभाग होता.---------------------------------शाळा बंद आंदोलनामध्ये राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षक व इतर कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता. शाळा बंद आंदोलनाला पाठिंबा देऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक संघाने शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर केले असून, मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे. निवेदन देण्यासाठी मनीष गावंडे, मो. जावेदजुम्मा यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.