रेल्वे तत्काऴ तिकिटांच्या वेऴेत फेरबदल

By Admin | Updated: June 10, 2015 16:24 IST2015-06-10T16:24:47+5:302015-06-10T16:24:47+5:30

भारतीय रेल्वेच्या तत्काऴ तिकिटांच्या वेळेत फेरबदल करण्यात आले आहेत.

Shuffle in Railway Tatkal Times | रेल्वे तत्काऴ तिकिटांच्या वेऴेत फेरबदल

रेल्वे तत्काऴ तिकिटांच्या वेऴेत फेरबदल

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.१० - भारतीय रेल्वेच्या तत्काऴ तिकिटांच्या वेळेत फेरबदल करण्यात आले आहेत. तसेच, यामध्ये प्रवाशाने तत्काळ तिकीट रद्द केल्यास त्याला ५० टक्के रिफंड मिऴणार आहे. याचबरोबर एसी क्लासचे बुकिंग सकाळी १० ते रात्री ११ वाजेपर्यंत करता येणार आहे, तर सिल्पर क्लासचे बुकींग सकाळी ११ ते रात्री १२ वाजेपर्यंत करता येणार आहे. 
नविन नियमानुसार एसी क्लासचे आणि नॉन एसी क्लासचे तिकीट बुकिंग करताना जास्त वेळ रांगेत उभे राहण्याचा प्रवाशांचा त्रास कमी होणार असल्याचे दिसते. तसेच एजंटद्वारे तिकीट बुकिंग करण्यावर बंदी असण्याची शक्यता आहे. येत्या १ जुलैपासून रेल्वेच्या तत्काऴ तिकिटांच्या वेळेत फेरबदल करण्यात आलेले नविन नियम लागू करण्यात येणार आहे. 

Web Title: Shuffle in Railway Tatkal Times