शुभा मुद्गल, राकेश चौरसिया, राहुल देशपांडे यांचे सादरीकरण (भाग २)

By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:53+5:302015-02-11T23:19:53+5:30

याप्रसंगी पं. सतीश व्यास म्हणाले, शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने तसेच पं. सी. आर. व्यास यांचे स्मरण करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. पं. व्यास यांनी धनकोनी कल्याण, दुगम हिंडोल, शिवअभोगीसारख्या अनेक रागांची रचना केली. देशात त्यांचे अनेक शिष्य आहेत. त्यांच्या स्मरणार्थ वेगवेगळ्या शहरात महोत्सवांचे आयोजन केले आणि त्यात अनेक दिग्गज क लावंतांनी सादरीकरण केले आहे. हल्ली फ्युजन करण्याच्या नादात मूळ राग संगीताचा आत्मा हरवत चालला असताना अशा संगीत महोत्सवातून आपले अभिजात भारतीय संगीत नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि त्यांना आपल्या समृद्ध परंपरेची ओळख करून देणे आवश्यक आहे. त्यासाठीच हे आयोजन असून पं. सी. आर. व्यास यांच्या स्मृतींना वंदन करताना यात कुठलाही व्यावसायिक हेतू ठेवण्यात येत नाही. त्यामुळेच या नि:श्

Shubha Mudgal, Rakesh Chaurasia, Presentation of Rahul Deshpande (Part 2) | शुभा मुद्गल, राकेश चौरसिया, राहुल देशपांडे यांचे सादरीकरण (भाग २)

शुभा मुद्गल, राकेश चौरसिया, राहुल देशपांडे यांचे सादरीकरण (भाग २)

प्रसंगी पं. सतीश व्यास म्हणाले, शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने तसेच पं. सी. आर. व्यास यांचे स्मरण करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. पं. व्यास यांनी धनकोनी कल्याण, दुगम हिंडोल, शिवअभोगीसारख्या अनेक रागांची रचना केली. देशात त्यांचे अनेक शिष्य आहेत. त्यांच्या स्मरणार्थ वेगवेगळ्या शहरात महोत्सवांचे आयोजन केले आणि त्यात अनेक दिग्गज क लावंतांनी सादरीकरण केले आहे. हल्ली फ्युजन करण्याच्या नादात मूळ राग संगीताचा आत्मा हरवत चालला असताना अशा संगीत महोत्सवातून आपले अभिजात भारतीय संगीत नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि त्यांना आपल्या समृद्ध परंपरेची ओळख करून देणे आवश्यक आहे. त्यासाठीच हे आयोजन असून पं. सी. आर. व्यास यांच्या स्मृतींना वंदन करताना यात कुठलाही व्यावसायिक हेतू ठेवण्यात येत नाही. त्यामुळेच या नि:शुल्क महोत्सवाला सर्व रसिकांनी भेट द्यावी आणि रागसंगीताचा आनंद घ्यावा, असे आवाहन पं. सतीश व्यास यांनी केले.

Web Title: Shubha Mudgal, Rakesh Chaurasia, Presentation of Rahul Deshpande (Part 2)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.