शुभा मुद्गल, राकेश चौरसिया, राहुल देशपांडे यांचे सादरीकरण (भाग १)
By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:36+5:302015-02-11T23:19:36+5:30
- पं. सी. आर व्यास संगीत महोत्सव आजपासून : सप्तक, महाराष्ट्र ललित कला निधी

शुभा मुद्गल, राकेश चौरसिया, राहुल देशपांडे यांचे सादरीकरण (भाग १)
- ं. सी. आर व्यास संगीत महोत्सव आजपासून : सप्तक, महाराष्ट्र ललित कला निधी नागपूर : ज्येष्ठ हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पं. सी. आर. व्यास यांनी अनेक उत्तमोत्तम बंदिशी रचल्या. त्यांच्या बंदिशी देशभरात अनेक गायक सादर करतात. पं. सी. आर व्यास यांची अखेरची मैफिल नागपुरात झाली आणि त्यानंतर आठवडाभरातच त्यांचे निधन झाले. त्यामुळेच नागपूरशी आपले भावनिक संबंध आहेत. त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त सप्तक आणि महाराष्ट्र ललित कला निधी यांच्या संयुक्त विद्यमाने पं. सी. आर. व्यास स्मृती संगीत महोत्सवाचे आयोजन १२ ते १४ फेब्रुवारीदरम्यान डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले असल्याची माहिती पं. सी. आर. व्यास यांचे पुत्र आणि ज्येष्ठ संतूरवादक पं. सतीश व्यास यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवात प्रख्यात गायिका शुभा मुद्गल, संतूरवादक पं. सतीश व्यास, शौनक अभिषेकी, युवा बासरीवादक राकेश चौरसिया, गायक राहुल देशपांडे, सितारवादक शुभेंद्र राव आणि चेलोवादक सास्कीया राव हे दिग्गज कलावंत सहभागी होणार आहेत. त्यामुळे नागपूरकर रसिकांना महोत्सवात मेजवानी मिळणार आहे. हा महोत्सव तीनही दिवस सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. महोत्सवात सर्व रसिकांना नि:शुल्क प्रवेश देण्यात येईल. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाने महोत्सवाला प्रारंभ करण्यात येईल. डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि नव्या पिढीचे दमदार गायक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर संतूरवादक पं. सतीश व्यास यांचे संतूरवादन होईल. प्रख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य असलेल्या पं. सतीश त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संतूरवादनासाठी देश-विदेशात लोकप्रिय आहे. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुप्रसिद्ध सितारवादक शुभेंद्र राव आणि चेलोवादक सास्कीया राव यांची जुगलबंदी रसिकांना अनुभवता येणार आहे. शुभेंद्र आणि सास्कीया सुप्रसिद्ध सितारवादक पं. रविशंकर यांचे शिष्य आहे. यानंतर लोकप्रिय भजन व ठुमरी गायिका शुभा मुद्गल यांचे गायन रसिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाची सांगता १४ फेब्रुवारी रोजी युवा बासरीवादक राकेश चौरसिया यांच्या बासरीवादनाने क रण्यात येईल. ते प्रख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य आहेत. त्यानंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र शौनक अभिषेकी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.