शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:07 IST

Shubanshu Shukla News: भारताचे दुसरे अंतराळवीर असलेले शुभांशू शुक्ला हे त्यांच्या तीन इतर सहकाऱ्यांसह फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस स्टेशन येथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले आहेत. या प्रवासादरम्यान, शुभांशू शुक्ला यांनी देशवासीयांना उद्देशून एक संदेश पाठवला आहे.

राकेश शर्मा यांच्यानंतरचे भारताचे दुसरे अंतराळवीर असलेले शुभांशू शुक्ला हे त्यांच्या तीन इतर सहकाऱ्यांसह फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस स्टेशन येथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले आहेत. सुमारे २८ तासांच्या प्रवासानंतर ते प्रवास करत असलेलं ड्रॅगन हे अंतराळ यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणार आहे. या प्रवासादरम्यान, शुभांशू शुक्ला यांनी देशवासीयांना उद्देशून एक संदेश पाठवला आहे.

या संदेशामध्ये शुभांशू शुक्ला म्हणाले की, नमस्कार, माझ्या देशवासियांनो. काय सुंदर प्रवास आहे हा. ४१ वर्षांनंतर आपण पुन्हा अंतराळात पोहोचलो आहोत. यावेळी आम्ही ७.५ किमी प्रतितास वेगाने पृथ्वीच्या चहुबाजूला फिरत आहोत. माझ्या खांद्यावर माझा तिरंगा आहे. जो मला सांगतोय की, मी एकटा नाही आहे. मी तुम्हा सर्वांसोबत आहे.

ते पुढे म्हणाले की, माझा हा प्रवास आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने जाणारा प्रवास नाही तर भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेची सुरुवात आहे. तुम्ही सर्वांनीही या प्रवासात सहप्रवासी बनावे, अशी माझी इच्छा आहे. तुम्हा सर्वांची छाती अभिमानाने फुगली पाहिजे. या आपण सर्वांनी मिळून भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेची सुरुवात करूया. जय हिंद, जय भारत!

शुभांशू शुक्ला यांचं अंतराळ यान अंतराळ स्थानकाच्या दिशेने यशस्वीरीत्या रवाना झाल्यानंतर भारतीय हवाई दलानेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आकाशाला गवसणी घालण्यापासून ताऱ्यांना हात लावण्यापर्यंत, भारतीय हवाई दलाच्या वीराचा अदम्य भावनेने प्रेरित असा एक प्रवास, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी ऑक्सीओम-४ मोहिमेंतर्गत इतर ३ अंतराळवीरांसह अंतराळात झेप घेतली आहे. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस स्टेशन इथून शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर तीन अंतराळवीरांना घेऊन फाल्कन ९ रॉकेट आणि ड्रॅगन अंतराळ यान अंतराळ स्थानकाकडे रवाना झालं आहे.

टॅग्स :Indiaभारतisroइस्रोindian air forceभारतीय हवाई दल