नवी दिल्ली : ‘तुम्हीही भविष्यात अंतराळवीर होऊ शकता, चंद्राची सफरही करू शकता’... १२ दिवसांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेला भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला याने शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ही प्रेरणा दिली.
‘मी परत येईन आणि तुम्हाला मार्गदर्शन करेन. भविष्यात आपल्यापैकी अनेक जण अंतराळवीर होऊ शकतात. जिज्ञासू राहा, कठोर परिश्रम करा आणि आत्मविश्वास बाळगा. तुमच्यापैकी अनेक जण चंद्रावरही जाऊ शकतात’, अशा शब्दांत शुभांशूने विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील करिअरबाबत प्रेरणा दिली.मेघालय आणि आसाममधील सात शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शुभांशूने अनेक प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. या संवादासाठी ही शाळकरी मुले शिलाँग येथील अंतराळ अनुप्रयोग केंद्रावर एकत्र आली होती.
हॅम रेडिओने संपर्कविद्यार्थ्यांनी शुभांशूला हॅम रेडिओच्या माध्यमातून संवाद साधताना एकूण २० प्रश्न पाठवले होते. १० मिनिटांच्या या संवादात प्रशिक्षणाची माहिती शुभांशूने विद्यार्थ्यांना दिली.