श्रीरामपुरात दहा उमेदवारी अर्ज दाखल

By Admin | Updated: February 2, 2017 02:55 IST2017-02-02T02:55:24+5:302017-02-02T02:55:24+5:30

श्रीरामपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी दहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जामध्ये कॉँग्रेस उमेदवारांचाच समावेश आहे.

Shriramapura filing of nomination for ten nominations | श्रीरामपुरात दहा उमेदवारी अर्ज दाखल

श्रीरामपुरात दहा उमेदवारी अर्ज दाखल

रीरामपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी दहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जामध्ये कॉँग्रेस उमेदवारांचाच समावेश आहे.
तालुक्यात खुला असलेल्या बेलापूर गटात कॉँग्रेसकडून बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याच गटात सेनेकडून अशोक ज्ञानदेव थोरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय जयप्रकाश लक्ष्मीनारायण जाजू व मंगेश नामदेव गाडे यांचे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महिलेसाठी राखीव असलेल्या दत्तनगर गटात शोभा अशोक जगधने यांचा एकमेव अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या टाकळीभान गटातून गीतांजली राजू गांगुर्डे यांचा कॉँग्रेसच्या वतीने तर उंदिरगाव गटातून मंगल अशोक पवार यांनी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तालुक्यातील चारही गटात कॉँग्रेस उमेदवारांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
उंदिरगाव, टाकळीभान व बेलापूर गणात प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल झाला आहे. अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असलेल्या उंदिरगाव गणात शीला सुनील बर्डे यांनी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने तर टाकळीभान गणातून दीपाली नितीन पटारे यांनीही कॉँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बेलापूर गणातून विवेक गिरीधर वाबळे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shriramapura filing of nomination for ten nominations