श्रीगोंदा तालुका खरेदी-विक्री संघ स्वीकृत संचालकपदासाठी रस्सीखेच
By Admin | Updated: January 3, 2016 00:05 IST2016-01-03T00:05:02+5:302016-01-03T00:05:02+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुका खरेदी-विक्री संघ स्वीकृत संचालकपदासाठी अनेक दिग्गजांनी फिल्डींग लावली आहे. शनिवारी स्वीकृत संचालकपदाची निवड होणार होती, परंतु अंतर्गत वादावादी अन् गटबाजीमुळे ही निवड पुढे ढकलली आहे.

श्रीगोंदा तालुका खरेदी-विक्री संघ स्वीकृत संचालकपदासाठी रस्सीखेच
श रीगोंदा : श्रीगोंदा तालुका खरेदी-विक्री संघ स्वीकृत संचालकपदासाठी अनेक दिग्गजांनी फिल्डींग लावली आहे. शनिवारी स्वीकृत संचालकपदाची निवड होणार होती, परंतु अंतर्गत वादावादी अन् गटबाजीमुळे ही निवड पुढे ढकलली आहे.संघाचे अध्यक्ष संभाजी घुटे यांना विश्वासात न घेता संघाचे व्यवस्थापक जाधव यांनी स्वीकृत संचालक निवडीचा विषय अजेंड्यावर घेतला होता. संघ निवडणुकीनंतर सहमती एक्सप्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश भापकर यांना स्वीकृत संचालकाची संधी देण्याचे प्रा.तुकाराम दरेकर यांनी जाहीर केले होते.मात्र, स्वीकृत संचालकपदासाठी प्रा. तुकाराम दरेकर, गणपत परकाळे, प्रशांत दरेकर, सुरेश भापकर, दादा गावडे यांनी फिल्डींग लावली. काही संचालकांकडे तसे अर्ज देण्यात आले. संघाची बैठक चालू होताच प्रकाश निभोरे यांनी स्वीकृत संचालक पदाचा विषय मांडला, त्यावर संघाचे अध्यक्ष संभाजी घुटे म्हणाले की, यासंदर्भात श्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल, असे सांगितले.संघाचे स्वीकृत संचालकपद आपल्या समर्थकास मिळावे म्हणून दिग्गजांनी व्यूव्हरचना आखली आहे. आता पाचपुते, नागवडे, पानसरे, नाहाटा, भोसले, शेलार या नेत्यांपैकी कोणता नेता डावपेच टाकण्यात यशस्वी होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (तालुका प्रतिनिधी)